नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
भोळा माझा बळीराजा
बीज मातीत पेरते
विनवीत आकाशाला
वाट सरीची पाहते
एकदाची सर येता
शुष्क धरणी भिजते
मातीमधे निजलेला
जीव इवला जागते
वरी कोंब तो बघता
येई ओठावरी हसू
कुरवाळी अंकुराला
जसे नवजात शिशु
अंकुराचा धांडा होई
जोंधळा तो डौलदार
शेत शिवारात पक्षी
दाणा टिपण्या अधीर
मा-यावरी बसतसे
हाती गोफण घेऊन
बाळापरी जपे पीक
करी पालन-पोषण
करी कापणी-मळणी
धान्य खळ्यात आणते
दाणा पहिला वाहून
रुन देवाचे फेडते
रामकृष्ण रोगे
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! :Congrats: :Congrats:
शेतकरी तितुका एक एक!
पाने