Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : नियम आणि अटी

 
 

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : वर्ष ५ वे

कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण,
शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक
युगात्मा शरद जोशी यांच्या ८३ व्या जयंतीदिना निमित्त (३ सप्टेंबर २०१८)  

सादर करीत आहोत.....

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८

लेखनाचा विषय : शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण 
 
या स्पर्धेचे चार प्रकार असतील : गद्यलेखन स्पर्धा-२०१८, पद्यलेखन स्पर्धा-२०१८, अनुभवकथन स्पर्धा-२०१८ आणि समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०१८
 
  1.  गद्यलेखन स्पर्धा-२०१८ :              विभाग : अ) ललितलेख   ब) कथा   क) वैचारिक लेख ड) मागोवा इ) शोधनिबंध 
  2.  पद्यलेखन स्पर्धा-२०१८ :              विभाग : अ) पद्यकविता   ब) छंदमुक्त कविता   क) गझल   ड) गेय रचना/गीत (पोवाडा इत्यादी)
  3. अनुभवकथन स्पर्धा-२०१८ :      विभाग : अ) शेतीत राबताना आलेले अनुभव   ब) राजकीय पुढार्‍यांच्या विरोधाभासी भुमिकेचे आलेले अनुभव 
  4. समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०१८ : विभाग : अ) ललित/गद्य/कथासंग्रहाचे समीक्षण ब) काव्यसंग्रहाचे समीक्षण क) कवितेचे रसग्रहण ४) लेखाचे समीक्षण 

    (परिक्षणासाठी पुस्तकाची व रसग्रहणासाठी लेखाची/कवितेची निवड स्पर्धकाने स्वत:च करायची आहे. पुस्तक/लेख/कविता शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण या विषयाशी साधर्म्य राखणारे असणे अनिवार्य आहे.)
     

प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल

स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:

  • स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वतःचे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.
  • पूर्वप्रकाशित लेखन देता येईल मात्र लेखन प्रताधिकारमुक्त असावे. प्रताधिकारासंबंधी संपूर्ण जबाबदारी लेखक/कवीची असेल. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन लेखन/कविता द्याव्यात.
  • एक स्पर्धक सर्व विभाग मिळून जास्तीतजास्त कितीही प्रवेशिका सादर करू शकेल. मात्र एका स्पर्धकाचा एकापेक्षा जास्त पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. महत्तम गूण प्राप्त करणार्‍या रचनेची पारितोषिकासाठी निवड केली जाईल.

पारितोषिकाचे स्वरूप : प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल. पारितोषिकाचे स्वरूप मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके या स्वरूपाचे असेल.

निकाल : युगात्मा शरद जोशी यांच्या महापरिनिर्वान दिनी १२ डिसेंबर २०१८ रोजी अंतिम निकाल जाहीर केला जाईल, तो अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल.

पारितोषिक वितरण : २ व ३ फेब्रुवारी २०१९ ला पैठण जि. औरंगाबाद येथे होणार्‍या ५ व्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. तेव्हा स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत पारितोषिक स्वीकारता येईल.

प्रवेशिका सादर करण्याची पद्धत :
 
  1. स्पर्धा ०३ सप्टेंबर २०१८ ते १० ऑक्टोंबर २०१८ या कालावधीसाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी खुली राहील.
  2. लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात आपले लेखन प्रकाशित करावे लागेल. लेखन करण्यासाठी http://www.baliraja.com/node/add/spardha-2018 हा धागा वापरावा.    सादर झालेल्या प्रवेशिका येथे पाहता येतील.
  3. लेखन सादर करण्यासाठी लेखकाला/कवीला बळीराजा डॉट कॉम चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासदत्व विनामूल्य घेता येते. मोबाईलवरून लेखन सादर करायचे असल्यास शेतकरी संघटना मोबाईल ऍप (Mobile App) वापरणे सुलभ ठरू शकते. App डाऊनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=com.andromo.dev633912.app7... या लिंकवर क्लिक करा.
  4. स्पर्धकाची इच्छा असल्यास लेखन टोपण नावाने प्रकाशित करता येईल मात्र टोपण नाव धारक स्पर्धकाचे खरे नाव संपूर्ण परिचयासह  abmsss2015@gmail.com या मेलवर कळवणे बंधनकारक आहे.
  5. स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत संपूर्ण माहिती  abmsss2015@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. (ईमेलच्या विषयात : लेखनस्पर्धा- ललितलेख   ब) चरित्रलेख   क) वृत्तांतलेख  ड) अनुभवकथन/छंदमुक्त कविता/गझल असा उल्लेख असावा.) अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, संपर्क क्र, विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पोस्टाचा पत्ता देणे बंधनकारक आहे. अन्यथा स्पर्धक बाद ठरेल, याची नोंद घ्यावी.
  6. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
  7. स्पर्धेसाठी आंतरजाल हेच कार्यक्षेत्र असेल त्यामुळे जगभरातील कोणताही मराठी भाषिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. 
  8. परिक्षक मंडळ वगळता अन्य सर्वच (शेतकरी साहित्य चळवळीचे पदाधिकारी सुद्धा) या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
  9. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.
  10. गद्यलेखनासाठी कमाल शब्दमर्यादा - २००० शब्द एवढी असेल.
  11. गझलेतील एकूण शेरांच्या १/५ शेर विषयाशी निगडीत असेल तरी ती गझल पात्र समजली जाईल. गझल मुसलसल असणे अनिवार्य नाही.
नियम व शर्ती :

  1. स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. मात्र अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या मुद्रित अथवा आंतरजालीय विशेषांकात सदर लेखन प्रकाशित करायचे झाल्यास तसा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  2. स्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन आणि अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  3. स्पर्धकाला वयाचे बंधन असणार नाही.
  4. एखाद्या विभागात कमी प्रवेशिका आल्या तरी त्यातूनच विजेता निवडला जाईल. उदा. एखाद्या विभागात केवळ ३ प्रवेशिका प्राप्त झाल्या तरी त्यांनाच पारितोषिक घोषित केले जाईल. प्रवेशिका कमी आल्याची किंवा सादर झालेल्या प्रवेशिका दर्जेदार नव्हत्या अशी किंवा या प्रकारची तत्सम सबब सांगितली जाणार नाही.
  5. परीक्षक मंडळ १० सदस्यांचे असेल. सर्व परीक्षकांकडून आलेल्या गुणांच्या सरासरीनुसार अग्रक्रमाने विजेते निवडले जातील. स्पर्धेचा निकाल घोषित होईपर्यंत परिक्षकांची नावे गोपनिय ठेवण्यात येतील.
  6. सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मध्ये होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
  7. एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  8. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीकडे सध्या असलेले मनुष्यबळ लक्षात घेता अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  9. निकालाबाबत अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीने नियुक्त केलेले संयोजक मंडळ व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ बांधील नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  10. शेतीविषयाला केंद्रस्थानी ठेवून नवसाहित्याची जोमाने निर्मिती होण्यास नवचालना मिळावी, असा उद्देश या स्पर्धा आयोजनामागे असल्याने ही संपूर्ण स्पर्धा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती
                                                                                                                          
                आपला स्नेहांकित
                                                                                                                             
                    गंगाधर मुटे                                                                                                          
                संस्थापक अध्यक्ष                                                                             
     अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
*  *  *
येथे भेट द्या.
*  *  *
महत्वाची सूचना : मोबाईलवरून लेखन सादर करायचे असल्यास शेतकरी संघटना मोबाईल ऍप (Mobile App) वापरणे सुलभ ठरू शकते. App डाऊनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=com.andromo.dev633912.app7... या लिंकवर क्लिक करा.
*  *  *
 
 

Share

प्रतिक्रिया

  • Dr. Ravipal Bharshankar's picture
    Dr. Ravipal Bha...
    शनी, 08/09/2018 - 12:36. वाजता प्रकाशित केले.

    ५ वे अ. भा. म. शे. साहित्य संमेलन, पैठण जि. औरंगाबाद येथे होणार असल्याचे नुकतेच जाहीर झाले आहे. ही एक अतिशय आनंदाची बाब आहे. तसेच, युगात्मा शरद जोशी यांच्या जयंती प्रित्यर्थ दरवर्षी घेण्यात येणारी विश्वस्तरीय लेखनस्पर्धा देखील जाहीर झाली आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सप्टेंबर ते फेब्रुवारी हा काळ, आमच्या करीता 'शेतकरी चिंतनाचा' जाणार हे निश्चित. तसेच, त्या योगे साहित्य निर्मिती घडून येईल हे विशेष महत्त्वाचे.

    Dr. Ravipal Bharshankar

  • admin's picture
    admin
    शनी, 08/09/2018 - 14:30. वाजता प्रकाशित केले.

    धन्यवाद!
    आपल्यासारख्या कर्तव्यप्रवीण सहकाऱ्यांच्या बळावरच शेतकरी साहित्य चळवळ उभी राहिली असून एक एक मैलाचा दगड रोवत मार्गक्रमण करत आहे. Ramram

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 20/09/2018 - 22:56. वाजता प्रकाशित केले.

    प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत : ०२ ऑक्टोंबर २०१८ 
    विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ मध्ये सहभाग नोंदवणारांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत.

    1. तांत्रिक कारणामुळे अनेकांना प्रवेशिका दाखल करणे अजून पावेतो शक्य झालेले नाही, याची आम्हाला नम्र जाणीव आहे. संकेतस्थळाचा वापर करणे अनेकांना शक्य न झाल्याने त्यांनी आपल्या रचना ईमेल किंवा व्हाटसप व्दारे पाठवून त्यांना स्पर्धेत सहभागी करून घ्यावे, अशी विनंती केली आहे. पण ईमेल किंवा व्हाटसप व्दारे आलेल्या रचनांचा स्पर्धेत समावेश केला जाऊ शकत नाही, तसे केले तर स्पर्धा आयोजनाच्या मूळ उद्देशालाच तडा जातो, याची सर्वांनी तसेच संबंधितांनी नोंद घ्यावी.
    2. प्रवेशिका सादरकर्त्याने http://www.baliraja.com/node/add/spardha-2018 या धाग्यावरच आपली रचना सादर केली पाहिजे.
    3. बळीराजा डॉट कॉम वर रचना सादर करताना अडचणी येत असल्यास त्या संबंधात संपूर्ण सहकार्य व मदत करण्याची आमची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिलेली आहे आणि यापुढेही कायमच असेल, याचीही संबंधितांनी नोंद घ्यावी.
    4. बळीराजा डॉट कॉम वर रचना सादर करण्याची प्रक्रिया किचकट वाटत असली तरी ही प्रकिया तशी मुळीच किचकट नाही. कोणताही विषय अथवा प्रक्रिया आपल्याला माहिती नसल्याने किचकट वाटत असते. एकदा माहित झाली की तीच प्रक्रिया आपल्यासाठी सुलभ होऊन जाते.
    5. बदल्या काळात इंटरनेटचा वापर अपरिहार्य झाल्याने व शेतीविषयाला आंतरजालाच्या (इंटरनेट) च्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करण्याची ऐतिहासिक संधी उपलब्ध झाल्याने शेतकरी पुत्रांना इंटरनेटशी जोडून व्यक्त व्हायला मदत करणे, हेही या स्पर्धेचे एक प्रमुख ध्येय आहे.
    6. वाढीव मुदतीचा लाभ घेऊन प्रवेशिका सादर करण्याची संबंधितांना विनंती करण्यात येत आहे. तसेच ज्यांनी यापूर्वीच रचना सादर केलेल्या आहेत त्यांना काही संपादन करायचे असल्यास अंतिम मुदतीपूर्वी उरकून घ्यावे.
    7. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर संपादन करण्याची सुविधा बंद होत असते, कृपया याचीही सर्वांनी नोंद घ्यावी.

    - गंगाधर मुटे
    २०/०९/२०१८ 
    ********************* 
    Fingure-Right स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहितीसाठी >>> http://www.baliraja.com/node/1603
    Fingure-Right सादर झालेल्या प्रवेशिका पाहण्यासाठी >>> http://www.baliraja.com/spardha-2018
    Fingure-Right विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : शंका समाधान >>> http://www.baliraja.com/node/1200

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 20/09/2018 - 23:04. वाजता प्रकाशित केले.
    विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : शंका समाधान
    विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८

    १] स्पर्धेत भाग घेण्यासाठी आणि लेखन करण्यासाठी लेखकाला/कवीला बळीराजा डॉट कॉम चे सदस्यत्व घेवून LOG IN करणे आवश्यक आहे. सदस्यत्व विनामूल्य घेता येते. सदस्य नसल्यास खालील लिंक वापरा ......
          अ)  नवीन खाते बनवा >>> http://www.baliraja.com/user/register

          ब)  नव्या संकेताक्षरासाठी विनंती करा. >>> http://www.baliraja.com/user/password

          क)  सदस्यत्व कसे घ्यावे? >>> http://www.baliraja.com/node/29

    २]  स्पर्धेत लेखन करण्यासाठी >>> http://www.baliraja.com/node/add/spardha-2018

    ३]  स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहितीसाठी >>>  http://www.baliraja.com/node/1603

    ४]  सादर झालेल्या प्रवेशिका पाहण्यासाठी >>> http://www.baliraja.com/spardha-2018

    ५]  मोबाईलवरून लेखन सादर करायचे असल्यास शेतकरी संघटना मोबाईल ऍप (Mobile App) वापरणे सुलभ ठरू शकते. App डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. >>> https://play.google.com/store/apps/details?id=com.andromo.dev633912.app7...  

    ६]  मराठी टाईप करण्याची पद्धत >>> http://www.baliraja.com/typehelp
    काही अडचणी आल्यास खालील प्रतिसादात लिहावे.
    विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी सर्वांना शुभेच्छा.
     ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
     

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 10/10/2018 - 14:54. वाजता प्रकाशित केले.

    ONLINE तंत्रज्ञान कार्यशाळा

    नमस्कार,
    स्पर्धेत प्रवेशिका दाखल करण्याची मुदत दोनदा वाढवूनही तांत्रिक प्रक्रिया न कळल्याने अनेकांना प्रवेशिका दाखल करता आलेल्या नाहीत. आणि प्रत्येकाला व्यक्तीनिहाय सर्व प्रोसेस समजावून सांगणे मला शक्य नाही. संबंधिताना विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ मध्ये आपापल्या प्रवेशिका दाखल करता याव्या म्हणून ONLINE तंत्रज्ञान कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. 

    प्रशिक्षणाची रूपरेषा
    पहिला टप्या : व्हाटसप, फेसबुक व संकेतस्थळांचा वापर यावर मार्गदर्शन केले जाईल.
    दुसरा टप्या : 
    ]   प्राथमिक :

    1. BSNL/Broadband नेट कनेक्टिव्हिटी 
    2. मोबाईल नेट कनेक्टिव्हिटी
    3. राऊटर
    4. मोबाईल हॉटस्पॉट  
    5. ब्राउझर 
    6. सर्च इंजिन
    7. Maps आणि GPS

     ]   लेखनपद्धती :

    1. इंटरनेटसाठी देवनागरी लिपी
    2. मोबाईल : गुगल IME, हँडराईटिंग आणि मराठी Speech To Text
    3. कॉम्प्यूटर : गमभन, बरहा, गुगल IME आणि हँडराईटिंग

     
    ]   सामाजिक माध्यम (Social Media) :

    1. सामाजिक माध्यमांची ओळख व प्रकार
    2. संकेतस्थळ, फ़ेसबूक, ट्विटर, व्हाटसप व मोबाईल अॅपचा वापर कसा करावा?
    3. Sign Up, Sign In, अपलोड, डाऊनलोड, ईमेल, : ओळख आणि प्रात्यक्षिक
    4. इंटरनेट बँकिंग

    तरी सर्वांना विनंती आहे कि, त्यांनी  https://chat.whatsapp.com/5xjTESc1LgVBCIAzQzRTwx  या लिंकचा वापर करून SS-15 IT कार्यशाळा व्हाटसप ग्रुपवर सामील व्हावे.

                        गंगाधर मुटे                                                                                                          
                    संस्थापक अध्यक्ष                                                                             
         अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ

    शेतकरी तितुका एक एक!

  • Dhirajkumar Taksande's picture
    Dhirajkumar Taksande
    गुरू, 11/10/2018 - 11:19. वाजता प्रकाशित केले.

    अभिनंदन
    ५ वे अ. भा. म. शे. साहित्य संमेलन, पैठण जि. औरंगाबाद येथे होणार असल्याचे नुकतेच जाहीर झाले आहे. त्याबद्दल अभिनंदन!!!! व संमेलनाचे यशस्वीतेसाठी खूप खूप शुभेच्छा!!!!
    खरच ही एक अतिशय आनंदाची बाब आहे. तसेच, युगात्मा शरद जोशी यांच्या जयंती प्रित्यर्थ दरवर्षी घेण्यात येणारी विश्वस्तरीय लेखनस्पर्धा देखील जाहीर केली
    . त्यामुळे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्हाला अभिव्यक्त होण्यासाठी हा मंच उपलब्ध करून दिला त्या बद्दल आपले खुप आभार!!!!
    अतिशय ज्वलंत विषयावर लेखनाची संधी मिळाली. बरच वाचन झालं. दृष्टीपल्याड जाता आले वास्तवा पर्यंत उतरता आलं. ते रचण्याचा छोटासा प्रयत्न केला. वास्तव शब्दात मांडता येणे सोपे नाही, पण हा काळ, आमच्या करीता 'शेतकरी चिंतनात' 'गेला हे निश्चित.

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 11/10/2018 - 13:07. वाजता प्रकाशित केले.

    Ramram Ramram

    शेतकरी तितुका एक एक!

  • पाने