नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*अस्वस्थ काळ अधोरेखित करणारा - माणसाच्या सोयीचा देव*
* * *किरण शिवहर डोंगरदिवे* * *
कवितेच्या क्षेत्रात जशी जशी नव नवीन नावे रुळू लागली आहेत तास तशी कवितेच्या नावाखाली काहीही वाचकांच्या माथी मारण्याचा प्रकार सुरु झाला आहे. इतरांच वाचन करायचे नाही आपण जे लिहिले ते खरे समजायचे आणि whats app आणि Facebook च्या माध्यमातून जग बघायचे असा काही अनुभव नवीन कविता संग्रह वाचताना येत असतो. अश्या गोंधळलेल्या कालखंडात सागर काकडे यांचा *"माणसाच्या सोयीचा देव"* वाचायला मिळाला आणि अजून महाराष्ट्रात नवी काव्यप्रतिभा सजग आहे याची जाणीव झाली.
अर्थात संग्रहात चार दोन समांतर आणि दोन नितांत सुंदर कविता असतातच. पण चांगल्या आशयघन कवितांची संख्या पाहता सागर काकडे ने निवडलेल्या कवितेचे विषय लक्षात घेता वर्तमानातील प्रभावी काव्य म्हणून सागर काकडे च्या "माणसाच्या सोयीचा देव" या संग्रहाच्या उल्लेख करावा लागेल.
"मी माणसाच्या सोयीचा देव घडविणार आहे
निळ्या, हिरव्या, केशरी रंगात त्याला मढविणार आहे
यावे कुणीही अंगणात या एकाच छत्राखाली
कुणी धम्म म्हणावे, कुणी हे राम, कुणी महंमद अली"
या ओळी वाचताना तथागत भगवान बुद्ध, महावीर, महात्मा फुले आणि कलपर्वाचा शिवधर्म ह्या सर्व धर्मात माणूस आणि संविधान तत्व सोडून दुसरे काय आहे? म्हणून आणखी नवा देव घडविण्याचा कवीचा मानस आहे ते काळात नाही? या ठिकाणी कवी बोलण्याच्या ओघात फार मोठी गोष्ठ बोलत आहे मात्र आपण यापूर्वीच्या धर्मसंस्थापकापेक्षा मोठा विचार सांगू शकत नाही असे सागरला सांगावेसे वाटते. आज माणसाच्या सोयीचा देव घडविण्यापेक्षा मानसा माणसाला संविधान आत्मसात करायला लावणे गरजेचे आहे. धर्म आणि देव कोणताच वाईट नसतो मात्र त्यांचे हस्तक जेव्हा स्वार्थ साधायला सुरुवात करतात तेव्हा धर्म संस्थापकांच्या कर्तुत्वावर पाणी फिरते हे आपण समजून घेतले पाहिजे. ह्याची जाणीव सागरच्या कवितेतून होते.
शेतकरी आत्महत्या बाबीवर सागरने सखोल चिंतन करीत शेतकरी आत्महत्येवर कवित्या केल्या आहेत. अप्रूप, टच अशा कवितांमधून ते प्रकर्षाने जाणवत राहते.
"रोज मारणाऱ्या बालीराज्याच्या बातमीला
आता पाहिल्यासारखं जोर नाही
आणि करोडो रुपये बुडवून
पाळणारा मल्या ह्या देशासाठी चोर नाही"
अशा ओळीतून शेतकर्याची स्थिती व वर्तमानतील विजय माल्यासारख्या प्रवृत्तीवर सागर णे चाबूक ओढला आहे. मर्दानगी, या दुनियेत अशा कवितांमधून स्त्रीवर्गाचे दु:ख अधोरेखित करताना माडीवर सारख्या रचनेतून गर्भलिंग निदान हा भेदक प्रश्नही प्रचंड अस्वस्थ करून जाणारा असतो, तितकाच अस्वस्थ करणारा वर्तमान झोपडीतील स्वप्ने मधेही असतो. प्रचंड मारहाण करून "दिली तवाच मेलीस" हे वाक्य ऐकून सासरला परत मार खाण्यासाठी परतणारी माय सागराच्या संग्रहात भेटली हे वास्तव आजपर्यंत कुणी अधोरेकीत केले असेल असे मला आठवत नाही. बस झाले आता ह्या एका विलक्षण कवितेची कथावस्तू दाभोलकर, पानसरे, तुकाराम अशा प्रभूतींच्या हत्येबाबत विचार करायला लावणारी असून वर्तमानाचे पडसाद सागराने किती जाणीवपूर्वक व अभ्यासपूर्वक घेतले आहेत याची जाणीव करून देते.
अनेक कवितांमधून गंभीर विषय हाताळणारा हा कवी मंचावर सुंदर रचना सादर करतो. बाल्स धरली बारन किंवा गावाकडच प्रेम सारख्या निखळ मनोरंजनातून संबोधन करणार्या कविताही छान जमल्या आहेत
"शेवटी तिच्या लग्नाची पत्रिका घरी यायची,
आम्ही ती तेव्हा मात्र निरखून वाचायचो
कार्यवाहकाच्या यादीत तेव्हा आम्ही असायचो
तीच लग्न तेव्हा जबाबदारीन पार पडायचो"
अश्या प्रकारे विनोदी मनोरंजनातून कवीने आपल्या रचना या संग्रहात दिल्या आहेत. एकंदर थोडीफार विनोदी लकेर सोडली तर सागर काकडे यांची एकूण कविता आजच्या अस्वस्थ समाजाचे दु:ख मांडणारी आहे. फक्त समस्या मांडणे हा त्यांचा उद्देश नसून त्याला विरोध करून तिचा प्रतिकार करण्याचे काम सागराचे शब्द करत असतात.
*यशोदीप पब्लिकेशन* यांनी तयार केलेल्या ह्या संग्रहाचे *मुखपृष्ठ विष्णू थोरे* यांनी अतिशय आकर्षक आणि आशयानुरूप तयार केले आहे. सागराच्या काव्य प्रवासास आता सुरुवात झाली असून तो भावी पिढीतील एक महत्वपूर्ण आणि आश्वासक कवी असेल ह्यात शंका नाही अगदी त्याच्याच शब्दात सांगायचे झाले तर
वाटेत काटे किती मी पहाणार नाही
रुतले किती ते तरी थांबणार नाही
कवी सागर काकडे यांच्या भावी काव्यप्रवासास मनपूर्वक शुभेच्छा!
*किरण शिवहर डोंगरदिवे*
समतानगर, मेहकर, ता. मेहकर
मोबा. ७५८८५६५५७६
****************************
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने