नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पाया खचला
पाया खचला माणुसकीचा स्वार्थ बांधतो माडी
सत्य अडकते लबाड सुटते पळवत मोटरगाडी
धडधडते काह्रुदय अचानक उडते नाडीनाडी
नकोस लाजू मला पाहुनी उगाच वांदेवाडी
खोपा तुटता वादळ शमते चिमणी हरतच नाही
चिमणाही मग सोबत करतो गोळा काडीकाडी
खर्चतोस का शहरामध्ये जीवन श्वासासाठी
वाट पहाते गाव तुझे अन् निर्झर डोंगर झाडी
जिन्स घालुनी अधुनिकताही धावत सुटली परंतु
गतिरोधक हे धरून बसले कुंकू, बुरखा, साडी
काळी आई हताश झाली किंमत उरली नाही
दलाल हसतो वेशीवरती टांगत शेतीबाडी
अक्षर अक्षर मधुशाळा ही नशा गझलची चढली
हवी कशाला यशवंताला मदिरा, शिंदी, ताडी
---यशवंत,गंगाखेड
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
रचनेचा खुलासा
छंदोबद्ध कवितेतील लेखन असूनवेगवेगळे विषय हताळले गेले आहेत व सहावा शेर पुर्णपणे विषयाशी निगडीत आहे.
स्पर्धा सूचना - २
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण