नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
एल्गार
नोटाबंदी करुन साहेब
तुमी तुमचीच केली चांदी
आमच्या जीवनात मात्र
मरेपर्यंतची मंदी....
विकासाचं गाजर दाखवून
तुमी आमाले लुटून रायले
शेती माती वर भाषणं ठोकून
तिच्याशीच बेइमान होऊन रायले
माणसांपेक्षा आज तुमाले
गाय महत्त्वाची वाटते
औषधाविना लेकरु मरते ना साहेब
तवा जीव थटंथटं तुटते....
भूमिपुत्रांवरच जर का साहेब
आत्महत्येची वेळ यील
तुमीच सांगा तुमाले साहेब
मंग ही धरणी पोटात कशी घील....
भूमिपुत्रांनो तुमी आता
असा एल्गार करा
स्वतः मरण्याआधी चार-पाच
भ्रष्ट नेते मारुन मरा....
एकच मागणं तुमाले साहेब
नका रचू देशाचं सरण
नाईतं कास्तकाराईच्या हातून लिवलं जाईल
तुमा साऱ्याईचं मरण.....
मातीशी इमान राखून
जोवर बदलणार नाही नीति
तोवर अशीच अडकून राहील
कर्जाच्या विळख्यात शेती
त्या बुलेट ट्रेन अन् मेट्रोले साहेब
तुमी आमच्या नजरीतून बघा
एका दिवसापूरतं तरी साहेब
तुमी शेतकरी बनून जगा....
एका दिवसापूरतं तरी साहेब
तुमी शेतकरी बनून जगा.....
©अनिकेत जयंतराव देशमुख (अनु)
रा- गोपालखेड , पो- गांधीग्राम ,
ता. जि. अकोला 444006
mo-9689634332
©Copyright - Aniket J. Deshmukh
Email Id :-
anudesh25488@gmail.com
प्रतिक्रिया
मस्त
विषयाचा पद्यात्मक विस्तार आवडला, अनिकेत!
Dr. Ravipal Bharshankar
मनापासून खूप खूप आभार सर
मनापासून खूप खूप आभार सर
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
मनःपूर्वक धन्यवाद सर
मनःपूर्वक धन्यवाद सर
मनःपूर्वक धन्यवाद सर
मनःपूर्वक धन्यवाद सर
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण