सातवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, रावेरी
दिनांक : शनिवार, रविवार, २० व २१ मार्च २०२१
स्थळ : युगात्मा शरद जोशी ज्ञानपीठ, भूमीकन्या निवास, रावेरी ता. राळेगाव जि. यवतमाळ
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
प्रतिनिधी सहभाग शुल्क : शुल्काची रक्कम इच्छेनुसार पण अनिवार्य
नोंदणीची अंतिम तिथी : पुरेशी नोंदणी होईपर्यंत
प्रतिनिधी सहभाग नोंदणीची पद्धत :
-
सभागृहाची आसन क्षमता, निवासाच्या सोयीसुविधा व भोजनाची व्यवस्था लक्षात घेता गैरसोय होऊ नये म्हणून अग्रिम प्रतिनिधी नोंदणी करणे आवश्यक आहे.
-
प्रतिनिधी सहभाग शुल्क म्हणून स्वेच्छेने यथाशक्ती शुल्काची रक्कम अदा करणे अनिवार्य आहे. भरलेल्या रकमेची रीतसर पावती संमेलनस्थळी किट मध्ये दिली जाईल.
-
एक ते पाच प्रतिनिधी सहभाग शुल्क सामूहिकपणे भरुन एकत्रितपणे नोंदणी करू शकतात.
-
प्रतिनिधींना ३ वेळ भोजन, ४ वेळ चहा, अल्पोपहार, १ रात्र निवास व्यवस्था, माहिती किट आणि सहभाग प्रमाणपत्र मिळेल.
-
अग्रीम नोंदणी केल्यानंतर SMS द्वारे, व्हाटसपद्वारे, ईमेलद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे प्रतिनिधीला नोंदणी क्रमांक कळवला जाईल.
-
पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी अंतिम तिथीच्या आत सुद्धा नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
-
झालेल्या नोंदणीमधूनच परिसंवादातील वक्ते, कवी आणि गझलकार निवडले जातील आणि त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवले जाईल.
-
नोंदणी झालेल्या सर्व वक्ते, कवी आणि गझलकार यांना व्यासपीठावर संधी मिळेलच असे नाही, याची नोंद घ्यावी.
-
कोणत्याही सबबीखाली नोंदणीची रक्कम परत मिळणार नाही.
-
महत्वाची सूचना : नाव शक्यतो मराठीतच लिहावे, जेणेकरून प्रमाणपत्रावर नाव चुकीचे येणार नाही.
अ] प्रतिनिधी सहभाग शुल्क कसे भरावे :
पर्याय क्र. १ : ऑनलाईन किंवा थेट शुल्क खालील खात्यात जमा करावे.
Punjab National Bank
Branch - Hinganghat
A/c Name - SHETI ARTH PRABODHINI
A/c No - 0202000105179647
IFSC Code - PUNB0020200
MICR Code - 442024005
* * * *
पर्याय क्र. २ : खालील पत्त्यावर मनीऑर्डर करावा.
शेती अर्थ प्रबोधिनी
द्वारा : गंगाधर मुटे
मु.पो. आर्वी छोटी
ता. हिंगणघाट जि. वर्धा
पिन - ४४२३०७
मनीऑर्डर फॉर्मवर प्रतिनिधीने स्वतःचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नं. लिहिणे आवश्यक.
* * * *
ब] प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : पर्याय १ किंवा २ प्रमाणे सहभाग शुल्क भरून झाले की A किंवा B पैकी कोणतीही एक पद्धत निवडून प्रतिनिधी नोंदणी करावी.
A] ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी :
प्रतिक्रिया
सहभाग शुल्क
सहभाग शुल्क भरण्यासाठी phonepe चा पर्याय दिला तर काम सोपे होईल.
रावसाहेब जाधव (चांदवड)
हरकत नाही पण......
phonepe चा पर्याय द्यायला हरकत नाही पण संस्थेचं अकाउंट online/netbanking होत नाही. मी माझा नंबर दिला तर रक्कम माझ्या व्यक्तिगत खात्यात येईल. मग आर्थिक बेशिस्तीचे प्रकरण सुरु होईल.
मी लोकांना शिव्या घालतो मग ते लोक सुताने स्वर्ग गाठून मला ED दाखवतील.
शेतकरी तितुका एक एक!
पाने