नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मृत्यूस आज माझ्या, जे पाहणार होते।
खोटीच आसवे ती,जे वाहणार होते।1।
ग्रीष्मात जाळलो मी, उन्हात पोळलो मी ।
कष्टात हात माझे, जे राबणार
होते।2।
लक्ष्मीस काय सांगू, बाळास
दूध मागू।
पोरे हुषार माझे, जे शीकणार होते।3।
पाणी कुठून आणू,शेतीस काय लावू।
होणार कर्जमाफी, जे तारणार
होते।4।
धूंदाड पावसाने, ओल्या पिकास नेले।
भेसूर हासणारे, जे मारणार होते।5।
आश्वासने दिलेली, कोऱ्याच कागदांचे।
टाळूवरील लोणी, जे लाटणार होते।6।
आकांत पाहणारे,भारीच
पाहुण्यांचा।
माझ्याच भावनांना, जे हासणार होते।7।
जे पाहिले न नाते,ते ही समीप सारे।
हक्कास सांगणारे, जे भांडणार होते।8।
आधार ना कधीही, नाही कधी दिलासा।
प्रेतास हारपुष्पे, जे टाकणार होते।9।
शीडीस तोलणारे, माझे स्मशानभाई।
दाव्यास काल माझ्या, जे वाचणार होते।10।
श्रद्धांजलीस माझ्या, निःश्वास
रोखणारे।
आत्म्यास चीरशांती,जे सांगणार होते।।11।।
मंदा फोकमारे । वानखडे
वरूड
अमरावती
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने