नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कोरोना......(वऱ्हाडी बोली )
कोरोनानं केलं
घरातच बंदी
नेऊ कशी बंडी
वावरात
पान्या पावसानं
देल्ली यंदा साथ
कोरोनाची पाथ
निंदू कशी
अंतर राखून
पेरा म्हने रान
वख्तावर वाण
आनू कोंते
पाहून मुसकं
बुजाडले बैल
निसर्गाचा कौल
घेन्न बाबू
बुडग्यानं केला
म्हने निस्ता घोर
अंतरले पोरं
सोताचेच
अशी कशी बापा
ब्याद नवी आली
पुसावी खुशाली
सांगा कशी
बारोमास होते
जीवाची दयना
अधिक मयना
कोरोनाचा
हारपला नूर
वावराचा पार
बीमारीचा वार
परदेशी
रुतले जगाचे
चाक जरी इथं
कास्तकार तीथं
धावे पये
सापळो लौकर
अवशीद काही
सामाजाची वाही
करासाठी
रवींद्र अंबादास दळवी
२०२. श्री. वल्लभ अपार्टमेंट, विधाते नगर
नाशिक ,७०३८६६९५४२
प्रतिक्रिया
छान रचना सर
छान रचना सर
Ganesh Varpe
धन्यवाद वरपे सर
धन्यवाद वरपे सर
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
खुप छान...
अंतर्मनातली व्यथा छान मांडली...
दळवी जी , मस्त....
Narendra Gandhare
धन्याव गंधारे सर
धन्याव गंधारे सर
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
वास्तव अभंग दादा
वास्तव अभंग दादा
धन्यवाद अनिकेत भाऊ
धन्यवाद अनिकेत भाऊ
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
वऱ्हाडी बोली भाषेतील अभंग सुंदर
रवींद्र भौ वऱ्हाडी बोलीभाषेत लिहिलेला अभंग शेती आणि करोना यांचा समन्वय साधून अप्रतिम लिहिला आहे!
मुक्तविहारी
धन्यवाद मुक्तविहारी सर
धन्यवाद मुक्तविहारी सर
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण