नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कसेही करून...
आताशा,
पेलवील भार पाचटाचा
इतके ओमन तर झालेत पसरून छतावर...
आता फक्त
कुजकी मेढ तेव्हडी बदलणे बाकी आहे
आडघईची...
आजकाल
झाड नाही गं गावत कुठेही
मेढीजोगे...
जमल्यास पाहतो आज-
मिळतो का एखादा लोखंडी पाईप
भंगार बाजारात...
तोपर्यंत तू बांधून ठेव
बारीक पेंढ्या पाचटाच्या,
आणि जमल्यास
दोन ताट्याही ठेव गुफून...
आणि टोकर जरा कसबंद घे...
जमल्यास काथ्या वापर
घायपाताऐवजी...
सपर तर शाकारावेच लागेल कसेही करून,
पावसाळ्याच्या तोंडावर...
कोरड्यात असली ओढ ओलाव्याची तरी,
ओलाव्यात कोरडी जागाही
आवश्यक असते बावळे!
रावसाहेब जाधव ( चांदवड)
(9422321596)
७०, महालक्ष्मी नगर,
चांदवड, जि.नाशिक ४२३१०१
rkjadhav96@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने