नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
वांझ
नेहमीप्रमाणंच....
तुमच्यासारखंच....
हे बियानंही बोगस निघालं सरकार!
आलटून पालटून मारेकऱ्यांकडेच
पुन्हा तीच तक्रार !!
ज्यांनी उसवून टाकलीत आमची
उद्याची सोनेरी स्वप्न
हिरावून घेतलं मातीचं
गर्भारपणाचं सुख!
पाचवीलाच पुजलेलं
हे पिढीजात दुख!!
ही तर भ्रूणहत्याचं?
पंचवार्षिक योजनांमधल्या
आभासी आकडेवाऱ्यांसारखी?
तुमची हिरवळ वाढतेय...
माती मात्र पारखी !
माती झुरत राहिली
प्रसवपिडांच्या कळांसाठी
नी बाप हरखत राहिला
हिरव्या कोंबांसाठी !
पण त्याच्या भाबड्या आशेला
वास्तवाचा अंकुर फुटलाच नाही
कर्जाचा गळ्याभोवतीचा दोर
घट्ट झाला; पण सुटलाच नाही
बाप निळा काळा होवून
कुढत स्वतःवरच रुसला
नी मायच्या कपाळावरचा
लाल सूर्य पुसला !
मातीनंच घेतलंय आता
त्याला आपल्या कुशीत
लेकरही वाढतील याच
काळ्या आईच्या मुशीत !
माती माय नी बाप
तिघांच्याही डोळ्यांत
दिसायचं हिरवं सपान
लेकरांच्या वहीत दडलेलं
जसं पिंपळपान !
बापाला सहन झालं नाही
मातीचं वांझ राहणं?
मायला पोखरुण गेलं
बापाचं केवीलवाणं पाहणं !
तरीही बापाने
नव्हती सोडायची उमेद
करायचा होता
इथल्या भेसळीचा शिरच्छेद !!
निदान आता तरी
सोडून द्यावं
जगणं कन्हून कन्हून
लढायचं एकजुटीनं
भूमिपुत्र बनून !!
कदाचीत
त्याला ठाव नवतं
ही 'कृषीप्रधान व्यवस्थाच वांझ झालीय'
ह्या बियाण्यांसारखी म्हणून....!
ह्या बियाण्यांसारखी म्हणून.....!!
••••
©®✍️अनिकेत जयंतराव देशमुख (अनु)
(पाऊलखुणाकार )
(कवी, निवेदक व लेखक)
रा- गोपालखेड , पो- गांधीग्राम ,
ता. जि. अकोला 444006
MO. 9689634332
©®Copyright: - Aniket J. Deshmukh
Email - anudesh25488@gmail.com
दिनांक : १६ जुलै २०२० गुरुवार
गोपालखेड
प्रतिक्रिया
खूप छान अनिकेत
खूप छान अनिकेत
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने