![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
"गझल"
विषय : "कर्जाच्या जाचात शेती"
सावकाराचा तगादा, लागतो दारात हल्ली..!
शेत कर्जाच्या तयांनी, आणले जाचात हल्ली..!
राज्यकर्ते, कर्मचारी, योजनांनी लाल झाले,
अन म्हणोनी फक्त मंदी, नांदते देशात हल्ली..!
प्रकृतीच्या अडथळ्यांना, वावराने पार केले,
पण दलालांचा दरारा, वाढला गावात हल्ली..!
वाढला बोजा भयानक, सातबाऱ्यावर बळीच्या,
त्यामुळे गळफास घेतो, हा कृषक शेतात हल्ली..!
खत,बियाणे,औषधींचे, भाव आकाशास भिडले,
पीक कवडीच्या दराने, ढापले जातात हल्ली..!
रोगराईचा पिकावर, खूप प्रादुर्भाव होतो,
जाहली त्याच्यामुळे घट, धान्य उत्पन्नात हल्ली..!
कर्जमाफी घोषणेवर, निवडुनी आले परंतू,
हेच त्यांच्या राहिले ना, वाटते ध्यानात हल्ली..!
अन्नदाता हा 'रमेशा', या जगाला तारतो पण,
जीव त्याचा जात आहे, वाढत्या व्याजात हल्ली..!
रमेश अरुण बुरबुरे
रा. निंबर्डा, पोस्ट शिरोली
ता. घाटंजी, जि. यवतमाळ
पिनकोड ४४५३०१
मोबाईल नंबर : ९७६७७०५१७०
ईमेल आयडी : burbureramesh@gmail.com
प्रतिक्रिया
खूप छान रमेशभाऊ
खूप छान रमेशभाऊ
मनस्वी धन्यवाद सर जी....!!!
आपला ऋणी आहे सर.....! धन्यवाद
R.A.Burbure
थॅन्क्स सर
आपली अमूल्य प्रतिक्रियेसाठी मनस्वी धन्यवाद
R.A.Burbure
सुंदर गझल
मुक्तविहारी
हार्दिक धन्यवाद सर
खूप खूप आभारी आहे सर......
R.A.Burbure
बढिया!!
अप्रतिम गझल!! रमेश..
हार्दिक धन्यवाद धीरज सर
खूप खूप आभार
R.A.Burbure
दिवसेंदिवस छान गज़ल लिहतो आहेस तू!
छान जमली गज़ल. जवळजवळ सर्व शेरात विषयानुरूप भाव सांभाळण्याचा उत्तम प्रयत्न केलास तू. बढीया!
Dr. Ravipal Bharshankar
सर...आपले मार्गदर्शन आहे
मनस्वी धन्यवाद
R.A.Burbure
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
आदरणीय मुटे सर...मनस्वी धन्यवाद!
खरेतर विश्व स्तरीय स्पर्धेमुळे लिहायला खूप ऊर्जा मिळाली...जेम तेम कविता लिहायला लागलो होतो पहिल्याच वेळी शेवटल्या दिवशी प्रवेशिका सादर केली होती..अनेक प्रॉब्लेम आले पण त्यावेळी आपण मार्गदर्शन केलं अन् माझा त्यावेळी प द्य कवितेत प्रथम क्रमांक आला तिथून खऱ्या अर्थाने लिखाणाला बळ आले. आपला उपक्रम फारच स्तुत्य आहे प्रत्येकाने यात सहभाग नोंदवून शेतकऱ्याच्या समस्येला वाचा फोडावी......! त्यासाठी आपला मनस्वी आभारी आहे सर..
R.A.Burbure
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
http://www.baliraja.com/node/118
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - ११
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप