नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मी शरद जोशीला विद्वान नाहीतर संत मानतो याचे कारण असे कि अवघडातील अवघड गोष्ट सोपी करून सांगणे ह्याला संत म्हणतात त्यांनी शेतीचे अर्थशास्त्र तसेच इंडिया विरुद्ध भारत उणे अनुदान खुले अर्थ व्यवस्था हे विषय चांगल्या चांगल्या विद्वानाला समजले नाहीत पण ते विषय शाळेचे तोंड देखील पाहिलेले नाही अश्या निरक्षर शेतकऱ्यांना समजावून सांगितले आणि ते समजल्याची पावती म्हणून शेतकरी जेल मध्ये जायला तयार झाले एवढेच नव्हेतर पोलीस्यांच्या लाठ्या खायला तयार झाले नावाजलेले विद्वान देखील शेती तोट्यात आहे हे मानायला तयार नव्हते पण शरद जोशींनी या लोकांचे पितळ उघडे पाडले एवढेच नव्हेतर देश्याच्या विषय पत्रिकेवर शेतीच्या समस्येचा विषय आणला या करिता त्यांना खूप कष्ट घ्यावे लागले ज्या माणसाला शेती काय आहे हे माहित नसताना सुद्धा त्यांनी शेतीचे अर्थशास्त्र मांडले या उलट शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेली मुले मंत्रालया पर्यंत पोचली पण त्यांना शेतीच अर्थशास्त्र मांडता आले नाही
दुसरा प्रसंग असा २००३ सालचाच रावेरी जि यवतमाळ या छोट्याशा गावात शेतकरी संघटनेचे संयुक्त अधिवेशन भरले होते ३ दिवसाचे अधिवेशन पार पडले अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खुल्या अधिवेशनाच्या भाषणातून शरद जोशींनी शेतकऱ्याला आंदोलनाचा आदेश दिला कि आता कापसाचा प्रश्न सुटल्याशिवाय घरी कोणी जायचे नाही तर वर्ध्याला रेल रोको आणि रस्ता रोको करायचा शरद जोशीच्या आदेशाचे लाखभर शेतकऱ्यांनी स्वागत केले व सर्व शेतकरी ३ दिवसाच्या अधिवेशनातून थेट वर्ध्याच्या रेल रोको व रस्ता रोकोसाठी थंडीचे दिवस असताना रस्ता बंद पाडला आणि ह्या आंदोलनाची दाखल सरकारला घ्यावी लागली स्वतः मुख्यमंत्री विलासराव देशमुख बोलणी करण्याकरिता शरद जोशीला भेटायला आले मुख्यमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहावर भेटीची वेळ दिली पण शरद जोशींनी शेतकऱ्या समोर बोलणी व्हावी असा हट्ट धरला मुख्यमंत्री शेतकऱ्या समोर यायला नकार दिला परंतु शेतकऱ्यांच्या ताकदीपुढे मुख्यमंत्र्याला शेतकऱ्या समोर यावे लागले शरद जोशिनिओ १०० टक्के चुकारा द्यावा हि विनंती केली मुख्यमंत्र्यांनी सांगितले कि तुमची मागणी रास्त आहे पण सरकार अडचणीत आहे त्यावर शरद जोशींनी मुख्यमंत्र्यांना एक अट घातली कि उद्यापासून सर्व सरकारी नोकरांचे आणि प्रोफेसरांचे पगार सुद्धा ८० टक्के द्यावेत यावर मुख्यमंत्र्यांनी साहेबांना विनंती केली कि शरद जोशी साहेब तुमचे दिल्लीत चांगले वजन आहे आणि त्यावेळचे भाजपाचे अर्थमंत्री यशवंत सिंन्हा हे रूमचे चांगले मित्र आहेत त्यामुळे केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी हि विनंती केली त्यावर शरद जोशींनी मुख्य्मान्त्राची विनंती मान्य केली
मुख्यमंत्र्याला शेतकऱ्या समोर ९० टक्के चुकारा देतो हे बोलायला लावले मी विचार केला कि दुसर्या आंदोलनाचे नेते ५ स्टार हॉटेलमध्ये आंदोलनाची बोलणी करतात हा शरद जोशी तर शेतकऱ्या समोर आणि रस्त्यावर बोलणी करतात यानंतर शरद जोशी सोबतचे वेगवेगळे अनुभव आहेत उदा गुजरातमधील कार सेवा कि नर्मदा परिकर्मा असो कि उसाचे उपोषण कि झोनबंदीचे उपोषण असो किंवा दिल्लीतील किसान कुंभ असो असे कितीतरी कार्यक्रम आहेत हे लिहायला बसलो तर मला हा जन्म नक्कीच कमी पडणार शरद जोशी म्हणजे क्रांतिवीर सुर्यच आहे यामुळे मला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो बुडती हे जन देखवेना डोळा
म्हणुनी कळवळा येत असे
गोरगरीब उपेक्षित शेतकऱ्यासाठी आपले पूर्ण जीवन अर्पण केले शरद जोशींच्या विचारामुळे शेतकरी जागृत झाला व शेतकऱ्याच्या होणाऱ्या पिळवणुकीला आळा घालण्यासाठी रांत्रदिवस त्यांनी एक केला उसाचे एकरी व उत्पादन साखर उतारा उसाचे भाव याबद्दल शेतकरी चर्चा करू लागले कारखानदाराला प्रश्न विचारू लागले महात्मा गांधी ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज डॉबाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारावर मात करत शेतकऱ्या मध्ये मोठी क्रांती केली शरद जोशींनी आपल्या तत्वाप्रनालीशी कधीही तडजोड केली नाही शरद जोशींनी ज्यांना पाठबळ दिले ती मंडळी सोयीनुसार वेगवेगळ्या राजकीय मांडवाखाली गेली शरद जोशींनी त्याबद्दल कधीही खेद प्रकट केला नाही किंवा जाहीर टीका टिप्पणी केली नाही त्यांच्यामुळे शेती सहकार शिक्षण शेतकरी चळवळ अशा क्षेत्रात खूप मोठी क्रांती झाली शेतकऱ्यांचा ध्यास घेतलेले शरद जोशी कधीही स्वस्त बसले नाहीत किंवा थकवा जाणवू दिला नाही शरद जोशी नेहमी म्हणतात जि शिक्षा मी भोगायला तयार नाही ती शिक्षा मी कधी तुम्हाला देणार नाही त्यांच्या त्यागी आणि निर्भय जीवनामुळे सर्व सामान्य शेतकऱ्यांनी त्यांच्यावर अपर प्रेम केले तरुण शेतकऱ्यांच्या मुलांना प्रेरणा आणि उपेक्षितांना आधार देणारा हा नेता आपला वाटू लागला महात्मा गांधीनी मिळवलेले स्वातंत्र्य कांही वर्षांच्या आतच मुठभर भांडवलदाराच्या हातात गेले हे शरद जोशींच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी पुन्हा नव्याने आपल्या सुखी संसाराचा त्याग करून परत एकदा आपल्या आयुष्याची मशाल पेटवली आणि शेतकऱ्यांची चळवळ करून स्वातंत्र्यचा शोध घेतला शेतकऱ्याची चळवळ हाच त्यांच्या आयुष्याचा भाग बनला शेतकऱ्यांच्या चळवळीत अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिले त्याच कार्यकर्त्यांनी स्वार्थासाठी नंतर शरद जोशीची साथ सोडली शरद जोशी साहेब मात्र शेतकऱ्यासाठी अहोरात्र झटत राहिले ज्या मातीत जन्मलो त्या जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी त्यांच्या विकासासाठी शेतकरी संघटना जिवंत ठेवली एवढेच नव्हे तर अधिक जोमाने आपले कार्य चालू ठेवले म्हणून मला शरद जोशीवर भावात्गीतेमधील ४ ओव्या आठवतात
फलाश कर्म त्यागला विदवाणांनी त्याग म्हटला
सर्व कर्म फल त्याग याला म्हणती सन्यास
दोष युक्त सकाम कर्म त्यागावे म्हणती विदवाना
यज्ञ दानातपकर्म न त्यागावे म्हणती अन्य
अशा ह्या त्यागी संन्यासी संतामुळे शेतकऱ्यांचे भल झाल कि नाही मला माहित नाही पण त्यांच्या विचारामुळे अर्थशास्त्री सिद्धांतामुळे माझा व्यक्तिगत खूप फायदा झाला मी भारत सोडून इंडियात आलो आणी तेही शरद जोशीच्या कर्मभूमीत ते म्हणजे पुण्यामध्ये पुण्याहून जवळच देहू आहे आणी हे गाव देहू आणी आळंदीच्या मध्ये म्हणजे हा समभूज त्रिकोणच आंबेठाण गावाला जायला आजही रस्ता नाही तरीदेखील शरद जोशी शहरात न राहता आंबेठाण या छोट्याश्या गावाजवळच्या आपल्या शेतात राहतात
प्रतिक्रिया
अभिनंदन
अभिनंदन
गंगाधर मुटे यांचे आभिनंध्न
सर्व प्रथम गंगाधर मुटे यांचे अभिनंदन.
शेतकऱ्यांच्या मुलांना आपली "मन कि बात" व्यक्त करण्यासाठी एक हकाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्या बद्दल.
पाने