नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सगळेच आता लबाड झाले
तिजोरीचे उघडे कवाड झाले
निष्ठावंत ही निसटल्यावर
नवीन चेहरे घबाड झाले
खुप जनांनी खुप कमवल
काही आता कमावत आहेत
आहे ते वाचवण्यासाठी अन्य
खुप काही गमावत आहेत
सत्तेसाठी हे ही करू ते ही करू
अन पैशासाठी तर काहीही
हाच त्यांचा कावा असतो
बाकी दुसर काही नाही
बाहेर पडा हरकत नाही
आत या तुमचं स्वागत आहे
तुम्ही फोडा आम्ही फोडू
पाहू कुणाची किती ताकद आहे?
राजकारण्यांचा दसरा झाला
समर्थकांची दिवाळी झाली
मात्र बळीराजाचा पोळा रुसला
खरंच खुर्ची किती बावळी झाली
नवीन निवडणुका आल्या
तसे नवीन वायदे आले
पुढे सामान्यांचे तोटे झाले
पुढाऱ्यांचे फायदे झाले
कुणी आपली प्रतिष्ठा जपा
कुणी आपली खुर्ची जपा
पण हे सत्ताधारी सरकारा
आधी माझ्या कुणब्याला जपा
©®
डॉ खिल्लारे ब्रम्हदेव चंद्रकांत
8766825323
प्रतिक्रिया
मस्त
छान रचना.
Dr. Ravipal Bharshankar
मस्त
छान रचना.
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद सर
धन्यवाद सर
कृषीपुत्र
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद सर
धन्यवाद सर
आपले मनःपूर्वक आभार
कृषीपुत्र
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण