नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
..............खरे तर कांदा हे मसाल्याचे पिक आहे. ती जीवनावश्यक वस्तू तर आजिबातच नाही. कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी रोगी दगावला किंवा कुठला रोग कांदा न खाल्ल्याने वाढला असेही नाही. खरे तर आपले पूर्वज पावसाळ्यात कांद्याचे सेवन कमी करावे, किंवा बंदच करावे असा सल्ला देत. आमच्याकडे चम्पाशष्टी पर्यंत कांदा न खाण्याचे व्रत आजही काही भाऊ बहिणी ठेवतात. आणि त्यांना आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवल्याचे कुठे ऐकिवात नाही. तरीही आणिक भाडोत्री गरीब कैवारी दरवर्षी नेमाने कांद्याचे भाव पाडतात. .... आणि खाल्लेल्या हाड्काला जागणारे श्वान आभाळाकडे तोंड करून मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाने गळा काढतात.
प्रतिक्रिया
महाराष्ट्र सरकारने केंद्र
महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला चुकीची माहिती की, यंदा कांद्याचे उत्पादन ३० टक्यांनी कमी येणार आहे. मात्र जुना बंपर स्टॉक शिल्लक असल्याची माहिती दडवून ठेवण्यात आली.. अशी सारवासारव राष्ट्रवादी पक्षातर्फे केली जात आहे.
शेतीविषयावर केंद्र शासन किती बेपर्वाईने धोरण राबविते, याचा हा एक मासलेवाईक नमुना आहे.
शेतकरी तितुका एक एक!
प्रस्तावित लोकपाल विधेयकात या
प्रस्तावित लोकपाल विधेयकात या बेपार्वाइवर नुकसानभरपाइचि काय तरतुद आहे?
Navnath Pawar
Aurangabad, Maharshtra
पाने