नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकर्यांना कार्यशाळेत दिले कृषितंत्राचे धडे
तज्ज्ञांचे मार्गदर्शन : आधुनिक तंत्रावर चर्चा
लोकमत - दिनांक १९/०५/२२२०१५
समुद्रपूर : आपुलकी या सामाजिक संस्थाद्वारा शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी परिसरातील अनेक शेतकर्यांनी आधुनिक कृषीतंत्राची माहिती जाणुन घेतली. कार्यशाळेचे उद््घाटन आ. समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आपुलकी संस्थेचे अध्यक्ष अभिजित फाळके, श्रीकांत झोरे, रामेश्वर बरडे यांची उपस्थिती होती. कार्यशाळेतील विविध सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते.
यावेळी झालेल्या सत्रात 'शेतीविषयी बोलू काही' या विषयावर मार्गदर्शन करताना सचिन मालकर यांनी शेतकर्यांना शेती करताना येणार्या अडचणी व त्यावर मात करून शेती योग्य पद्धतीने कशाप्रकारे करता येईल याची माहिती दिली. तसेच डॉ. एल.बी. कलंत्री यांच्या मार्गदर्शनात 'रेशीम शेती आणि शेतीपूरक उद्योग' या विषयावर शेतकरी बांधवांसोबत चर्चा केली. रेशीम शेती करून शेतकर्यांनी आपले जीवनमान कसे उंचवावे व व्यवसाय करताना येणार्या अडचणींवर मात कशी करायची, यातून शेतकर्यांनी नव्या संधी कशा शोधाव्या याबद्दल मार्गदर्शन केले. तर पी.एस. देशमुख यांनी शेतीमालावर प्रक्रिया करून उद्योग करण्याबाबत मार्गदर्शन केले.
समारोपीय कार्यक्रमाला शेतकरी नेते विजय जावंधिया, शेतकरी संघटनेचे गंगाधर मुटे यांची उपस्थिती होती. जावंधिया यांनी शेतकर्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी एकत्रित येण्याची गरज व्यक्त केली. शेती करताना येणार्या अडचणीवर मात करण्याबाबत मार्गदर्शन केले. गंगाधर मुटे यांनी विचार मांडले. अभिजित फाळके यांनी कृषीतंत्राची माहिती दिली.
यावेळी संजय लोहकरे, सतीश नेवारे, भारत बापूराव कामडी यांच्यासह आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.(तालुका प्रतिनिधी)
******************
******************
******************
******************