![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
अरे पावसा पावसा
अरे पावसा पावसा
पडलास खूप छानं
झाडाला फुटले धुमारे
कोंब आले तरारूनं
अरे पावसा पावसा
पडलास खूप छानं
काळ्या आईच्या कुशीत
बाळ वाढतो जोमानं
अरे पावसा पावसा
पडलास खूप छान
हिरवा शालू नेसुनं
धरणी गेली हारखुनं
अरे पावसा पावसा
पडलास खूप छान
कासाविस चातकाची
तू भागविलीस तहानं
अरे पावसा पावसा
पडलास खूप छानं
तालं धरतोय मयुर
कोकीळा गातीया गाणं
अरे पावसा पावसा
पडलास खूप छानं
हिरवा बघून शिवार
हर्षुन गेले माझे मनं
अरे पावसा पावसा
पडलास खूप छानं
पांढरं साेनं पिकवूनं
फेडीन सावकाराचं देणं
मरणार नाही आता
कासरा गळ्याला लावूनं .
कवी
बा.सो . कांबळे
परळी वै. जि. बीड
मो. नंबर = 9860806747
प्रतिक्रिया
खूप छान
खूप छान
व्वाह .
मस्त
सुंदर रचना..
Narendra Gandhare
मरणार नाही आता
मरणार नाही आता
कासरा लावुन
सुंदर रचना सर
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
http://www.baliraja.com/node/118
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - ११
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप