नमस्कार *Ramram*
- व्यवस्थापक
~~~~~~~~~~~~~~
दिनांक १०/१०/२०१६ ची पोस्ट :
काही मुख्य नवीन सुविधा :
- Ctrl + Space बार वापरुन आता लेखनाची भाषा बदलता येऊ शकते.
- Back To Top या बटन सुविधेमुळे पेज स्क्रोल करणे सुलभ होईल.
- रेमिंगटन टाइपराइटर : बळीराजा डॉट कॉमवर मराठी टंकलेखनासाठी ’गमभन’ सुविधा उपलब्ध आहे. संकेतस्थळासाठी ही सर्वोत्तम आणि सोईची देवनागरी युनिकोड टंकलेखन सुविधा असल्याने बहुतेक सदस्य हीच टंकलेखन प्रणाली पसंत करतात. मात्र काही सदस्यांनी रेमिंगटन टाइपराइटींग सुविधा उपलब्ध करावी, अशी इच्छा प्रदर्शीत केल्याने या पानापुरती रेमिंगटन टाइपराइटर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधेमध्ये Phonetic, Typewriter आणि Remington अशी तिहेरी टंकलेखनाची सुविधा उपलब्ध असल्याने आपापल्या सोयीनुसार हवी ती टंकलेखन प्रणाली वापरणे सहज शक्य आहे. अधिक माहितीसाठी आणि लेखन करण्यासाठी http://www.baliraja.com/indic हा धागा वापरावा.
- संकेतस्थळावर नियमितपणे वावरणार्यांनी मुखपृष्ठ या पेज ऐवजी नवीन लेखन या पेजचा वापर करावा.
धन्यवाद आणि शुभेच्छेसह
- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~
मोबाईलधारकासाठी खास : बळीराजा डॉट कॉम हे संकेतस्थळ मोबाइलवरून अवलोकन व लेखन करणारांनी मोबाईल आवृतीचा वापर करायला हरकत नाही. डाव्या बाजुच्या विजेट्मध्ये मोबाईल स्विच या ब्लॉकमध्ये Desctop आणि Mobile असे दोन पर्याय आहेत. पैकी सोईचा व आवडता पर्याय निवडावा. आशा आहे की मोबाईल आवृतीचा वापर केल्यास संकेतस्थळाचे अवलोकन अथवा संकेतस्थळावर लेखन करणे अधिक सुलभ ठरू शकेल.

लेखनाची भाषा बाय डिफॉल्ट
विनिता
लेखनाची भाषा बाय डिफॉल्ट मराठीच ठेवा.
मनपूर्वक धन्यवाद!
गंगाधर मुटे
नोंद घेतली आहे. तसे करतो. मनपूर्वक धन्यवाद!
टीप : Ctrl+Space वापरल्यावर लगेच भाषा बदल होतो.
मोबाईलधारकासाठी खास
गंगाधर मुटे
मोबाईलधारकासाठी खास :
बळीराजा डॉट कॉम हे संकेतस्थळ मोबाइलवरून अवलोकन व लेखन करणारांसाठी आता आपोआपच मोबाईल आवृतीवर रिडायरेक्ट केले जाईल. संकेतस्थळाची ही नवीन स्वयंचलित यंत्रणा दर्शकाने डेस्कटॉप वापरला आहे की मोबाईल वापरला आहे याचे संश्लेशन करुन दर्शकाला आपोआपच डॅस्कटॉप/मोबाईल आवृत्तीकडे डायव्हर्ट करेल.
मात्र मोबाईल वापरुनही डेस्कटॉप आवृत्ती किंवा मोबाईल आवृती पैकी कोणत्याही आवृतीची निवड करण्यासाठी मोबाईल स्विचचा वापर करता येईलच.
आपल्या सूचना आवश्यक
गंगाधर मुटे
संकेतस्थळाच्या नव्या संरचनेतील तृटी, नवीन सुविधा व मोबाईल आवृत्ती
नमस्कार *Ramram*
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा २०१७ च्या निमित्ताने पुन्हा जाणवले कि, अनेक स्पर्धकांना इच्छा असूनही शेवटपर्यंत आपली प्रवेशिका संकेतस्थळावर सादर करताच आली नाही. शेती विषयाशी संबंधित आपला वाचक आणि लेखक आंतरजालाच्या वापरापासून बराच लांब आहे. त्यामुळे त्यांना येणाऱ्या अडचणी सहज समजून घेता येण्यासारख्या आहेत.
पण तरीही इच्छूकांना सहजगत्या संकेतस्थळाचा वापर करता यावा म्हणून संकेतस्थळाची रचना आणि कार्यशैली अधिकाधिक सुटसुटीत असावी असा, आमचा प्रयत्न असतो. त्याच अनुषंगाने बऱ्याच सुधारणा नव्याने करण्यात आल्या आहेत.
वाचक/लेखकांना विनंती आहे कि त्यांनी जाणवलेल्या त्रुटी किंवा आवश्यक वाटणारे बदल कृपया लक्षात आणून द्यावे.
- व्यवस्थापक
एकदा समजलं की आपोआप सोप्प वाटतोय सगळं
Ramesh Burbure
मला तरी सुरुवातीला प्रॉब्लैम आला.पण नंतर हळूहळु जमत गेलं.
Log in करताना पासवर्ड चा जरा त्रास होतो मेल ला जावुन कनेक्ट करायला..ते थोडं सोप्प करयला हवं...बस्स बाकी ok
Log in प्रक्रिया अत्यंत सोपी
गंगाधर मुटे
बुरबुरे सर,
Log in प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ आहे. नवीन खाते बनवताना किंवा नव्याने पासवर्ड/संकेताक्षर मागवताना फक्त इमेलची गरज असते.
Log in करण्यासाठी सदस्य प्रवेश च्या ब्लॉकमध्ये सदस्यनाम व संकेताक्षर (पासवर्ड) लिहायचा आणि प्रवेश या बटनवर क्लिक करायचे.
बस्स इतके सोपे आहे हे. हि तुमचा पासवर्ड ब्राऊजर किंवा ऍप मध्ये सेव्ह केला तर दरवेळेस सदस्यनाम व संकेताक्षर लिहायची सुद्धा गरज नसते.
स्माईली चा वापर
admin
स्माईली चा वापर
आता सदस्य आपल्या लेखनामध्ये खालील सुविधांचा वापर करू शकतात.
१) स्माईली चा वापर : >>> लेखनबॉक्सच्या खिडकीच्या खाली असलेल्या More information about text formats या लिंकवर क्लिक केल्यास तिथे स्मायलींचे सांकेतिक Text उपलब्ध आहेत,
त्याच लिंकवर अन्य माहितीसुद्धा उपलब्ध आहे.
२) अक्षर बोल्ड करणे.
३) लाल रंगात शीर्षक
४) लिंक देणे
५) बाहेरील लिंकच्या आधारे लेखनात फोटो घालणे.
६) आणखी बरेच काही.
*Fingure-down* *fd* खाली प्रतिसाद लिहून आपण ट्रायल घेऊ शकाल. *Ramram* :R: