Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

त्यागी संत

Main page content

rameshwar
By rameshwar | 3:47 PM IST, रवी September 20, 2015
वृत्तांतलेख

मी शरद जोशीला विद्वान नाहीतर संत मानतो याचे कारण असे कि अवघडातील अवघड गोष्ट सोपी करून सांगणे ह्याला संत म्हणतात त्यांनी शेतीचे अर्थशास्त्र तसेच इंडिया विरुद्ध भारत उणे अनुदान खुले अर्थ व्यवस्था हे विषय चांगल्या चांगल्या विद्वानाला समजले नाहीत पण ते विषय शाळेचे तोंड देखील पाहिलेले नाही अश्या निरक्षर शेतकऱ्यांना समजावून सांगितले आणि ते समजल्याची पावती म्हणून शेतकरी जेल मध्ये जायला तयार झाले एवढेच नव्हेतर पोलीस्यांच्या लाठ्या खायला तयार झाले नावाजलेले विद्वान देखील शेती तोट्यात आहे हे मानायला तयार नव्हते पण शरद जोशींनी या लोकांचे पितळ उघडे पाडले एवढेच नव्हेतर देश्याच्या विषय पत्रिकेवर शेतीच्या समस्येचा विषय आणला या करिता त्यांना खूप कष्ट घ्यावे लागले ज्या माणसाला शेती काय आहे हे माहित नसताना सुद्धा त्यांनी शेतीचे अर्थशास्त्र मांडले या उलट शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेली मुले मंत्रालया पर्यंत पोचली पण त्यांना शेतीच अर्थशास्त्र मांडता आले नाही
दुसरा प्रसंग असा २००३ सालचाच रावेरी जि यवतमाळ या छोट्याशा गावात शेतकरी संघटनेचे संयुक्त अधिवेशन भरले होते ३ दिवसाचे अधिवेशन पार पडले अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खुल्या अधिवेशनाच्या भाषणातून शरद जोशींनी शेतकऱ्याला आंदोलनाचा आदेश दिला कि आता कापसाचा प्रश्न सुटल्याशिवाय घरी कोणी जायचे नाही तर वर्ध्याला रेल रोको आणि रस्ता रोको करायचा शरद जोशीच्या आदेशाचे लाखभर शेतकऱ्यांनी स्वागत केले व सर्व शेतकरी ३ दिवसाच्या अधिवेशनातून थेट वर्ध्याच्या रेल रोको व रस्ता रोकोसाठी थंडीचे दिवस असताना रस्ता बंद पाडला आणि ह्या आंदोलनाची दाखल सरकारला घ्यावी लागली स्वतः मुख्यमंत्री विलासराव देशमुख बोलणी करण्याकरिता शरद जोशीला भेटायला आले मुख्यमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहावर भेटीची वेळ दिली पण शरद जोशींनी शेतकऱ्या समोर बोलणी व्हावी असा हट्ट धरला मुख्यमंत्री शेतकऱ्या समोर यायला नकार दिला परंतु शेतकऱ्यांच्या ताकदीपुढे मुख्यमंत्र्याला शेतकऱ्या समोर यावे लागले शरद जोशिनिओ १०० टक्के चुकारा द्यावा हि विनंती केली मुख्यमंत्र्यांनी सांगितले कि तुमची मागणी रास्त आहे पण सरकार अडचणीत आहे त्यावर शरद जोशींनी मुख्यमंत्र्यांना एक अट घातली कि उद्यापासून सर्व सरकारी नोकरांचे आणि प्रोफेसरांचे पगार सुद्धा ८० टक्के द्यावेत यावर मुख्यमंत्र्यांनी साहेबांना विनंती केली कि शरद जोशी साहेब तुमचे दिल्लीत चांगले वजन आहे आणि त्यावेळचे भाजपाचे अर्थमंत्री यशवंत सिंन्हा हे रूमचे चांगले मित्र आहेत त्यामुळे केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी हि विनंती केली त्यावर शरद जोशींनी मुख्य्मान्त्राची विनंती मान्य केली
मुख्यमंत्र्याला शेतकऱ्या समोर ९० टक्के चुकारा देतो हे बोलायला लावले मी विचार केला कि दुसर्या आंदोलनाचे नेते ५ स्टार हॉटेलमध्ये आंदोलनाची बोलणी करतात हा शरद जोशी तर शेतकऱ्या समोर आणि रस्त्यावर बोलणी करतात यानंतर शरद जोशी सोबतचे वेगवेगळे अनुभव आहेत उदा गुजरातमधील कार सेवा कि नर्मदा परिकर्मा असो कि उसाचे उपोषण कि झोनबंदीचे उपोषण असो किंवा दिल्लीतील किसान कुंभ असो असे कितीतरी कार्यक्रम आहेत हे लिहायला बसलो तर मला हा जन्म नक्कीच कमी पडणार शरद जोशी म्हणजे क्रांतिवीर सुर्यच आहे यामुळे मला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो बुडती हे जन देखवेना डोळा
म्हणुनी कळवळा येत असे
गोरगरीब उपेक्षित शेतकऱ्यासाठी आपले पूर्ण जीवन अर्पण केले शरद जोशींच्या विचारामुळे शेतकरी जागृत झाला व शेतकऱ्याच्या होणाऱ्या पिळवणुकीला आळा घालण्यासाठी रांत्रदिवस त्यांनी एक केला उसाचे एकरी व उत्पादन साखर उतारा उसाचे भाव याबद्दल शेतकरी चर्चा करू लागले कारखानदाराला प्रश्न विचारू लागले महात्मा गांधी ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज डॉबाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारावर मात करत शेतकऱ्या मध्ये मोठी क्रांती केली शरद जोशींनी आपल्या तत्वाप्रनालीशी कधीही तडजोड केली नाही शरद जोशींनी ज्यांना पाठबळ दिले ती मंडळी सोयीनुसार वेगवेगळ्या राजकीय मांडवाखाली गेली शरद जोशींनी त्याबद्दल कधीही खेद प्रकट केला नाही किंवा जाहीर टीका टिप्पणी केली नाही त्यांच्यामुळे शेती सहकार शिक्षण शेतकरी चळवळ अशा क्षेत्रात खूप मोठी क्रांती झाली शेतकऱ्यांचा ध्यास घेतलेले शरद जोशी कधीही स्वस्त बसले नाहीत किंवा थकवा जाणवू दिला नाही शरद जोशी नेहमी म्हणतात जि शिक्षा मी भोगायला तयार नाही ती शिक्षा मी कधी तुम्हाला देणार नाही त्यांच्या त्यागी आणि निर्भय जीवनामुळे सर्व सामान्य शेतकऱ्यांनी त्यांच्यावर अपर प्रेम केले तरुण शेतकऱ्यांच्या मुलांना प्रेरणा आणि उपेक्षितांना आधार देणारा हा नेता आपला वाटू लागला महात्मा गांधीनी मिळवलेले स्वातंत्र्य कांही वर्षांच्या आतच मुठभर भांडवलदाराच्या हातात गेले हे शरद जोशींच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी पुन्हा नव्याने आपल्या सुखी संसाराचा त्याग करून परत एकदा आपल्या आयुष्याची मशाल पेटवली आणि शेतकऱ्यांची चळवळ करून स्वातंत्र्यचा शोध घेतला शेतकऱ्याची चळवळ हाच त्यांच्या आयुष्याचा भाग बनला शेतकऱ्यांच्या चळवळीत अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिले त्याच कार्यकर्त्यांनी स्वार्थासाठी नंतर शरद जोशीची साथ सोडली शरद जोशी साहेब मात्र शेतकऱ्यासाठी अहोरात्र झटत राहिले ज्या मातीत जन्मलो त्या जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी त्यांच्या विकासासाठी शेतकरी संघटना जिवंत ठेवली एवढेच नव्हे तर अधिक जोमाने आपले कार्य चालू ठेवले म्हणून मला शरद जोशीवर भावात्गीतेमधील ४ ओव्या आठवतात
फलाश कर्म त्यागला विदवाणांनी त्याग म्हटला
सर्व कर्म फल त्याग याला म्हणती सन्यास
दोष युक्त सकाम कर्म त्यागावे म्हणती विदवाना
यज्ञ दानातपकर्म न त्यागावे म्हणती अन्य
अशा ह्या त्यागी संन्यासी संतामुळे शेतकऱ्यांचे भल झाल कि नाही मला माहित नाही पण त्यांच्या विचारामुळे अर्थशास्त्री सिद्धांतामुळे माझा व्यक्तिगत खूप फायदा झाला मी भारत सोडून इंडियात आलो आणी तेही शरद जोशीच्या कर्मभूमीत ते म्हणजे पुण्यामध्ये पुण्याहून जवळच देहू आहे आणी हे गाव देहू आणी आळंदीच्या मध्ये म्हणजे हा समभूज त्रिकोणच आंबेठाण गावाला जायला आजही रस्ता नाही तरीदेखील शरद जोशी शहरात न राहता आंबेठाण या छोट्याश्या गावाजवळच्या आपल्या शेतात राहतात

अभिनंदन

admin

रवीवार, September 20, 2015 - 19:23
Permalink
New

अभिनंदन

:Y: :Y: :Y: :Y:

:congrats: :congrats: :congrats: :congrats:

  • Log in or register to post comments
गंगाधर मुटे यांचे आभिनंध्न

rameshwar

गुरुवार, October 1, 2015 - 13:01
Permalink
New

सर्व प्रथम गंगाधर मुटे यांचे अभिनंदन.
शेतकऱ्यांच्या मुलांना आपली "मन कि बात" व्यक्त करण्यासाठी एक हकाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्या बद्दल.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 8637 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 171 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    40 minutes 50 seconds ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    43 minutes 44 seconds ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    45 minutes 37 seconds ago
  • डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर, …
    46 minutes 49 seconds ago
  • डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर,…
    47 minutes 50 seconds ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
दिवास्वप्न 11
लाचार बहुजनांना दिवाळी शुभेच्छांचा उपयोग काय? 11
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 10
विदर्भाची कन्याकुमारी - शेगावचे आनंदसागर 10
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 10
संवाद - ईटीव्ही - शरद जोशी 10
चापलूस चमचा 10
शेतकरी साहित्य संमेलन : एका तपाकडून दुसऱ्या तपाकडे : वाटचालीची दिशा 9
मढे मोजण्याला 9
बळीराजा : जगातील धाडशी योद्धा 9
गंधवार्ता : महादीर्घकाव्य ॥२९॥ 9
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 9
हंबरून वासराले चाटते जवा गाय 9
रे जाग यौवना रे....!! 9
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 9
भुलाबाई कशी दिसते 9
काळजाची खुळी आस तू 9
एक सुखद साहित्यिक अनुभव: प्रतिनिधींचे मनोगत : 12sss 9
कविता - चल आता 9
नाचू द्या गं मला : लावणी ॥२६॥ 9
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 26,004
कान पकडू नये 25,912
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,759
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,590
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,409
माय मराठी स्तवन git 25,357
एवढा मोठा नांगूर... 25,127
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,089
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,050
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,965
कापसाचा उत्पादन खर्च 24,491
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,428
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,046
सदस्यत्व कसे घ्यावे? 24,040
शेतकरी पात्रता निकष 23,983
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,971
शेतकरी प्रकाशन 23,935
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,912
हे गणराज्य की धनराज्य? 23,882
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,750
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini