Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

बळीराजाचा पोवाडा

Main page content

By Subhash.patil | 5:00 PM IST, मंगळ November 24, 2026
गेय रचना/गीत/पोवाडा इत्यादी

बळीराजाचा पोवाडा
ओम नमो श्री जगदंबे, नमन तुज अंबे,
करून प्रारंभे | डफावर थाप तुंनतण्याची,
शेतीला साथ शेतकऱ्याची | शेती हा महाराष्ट्राचा प्राण, बळीराजाचे गाऊ गुणगान जी जी...
बळीराजाचे गाऊ गुणगान जी जी..||१||
आधी नमन धरणी मातेला, शेती करणाऱ्या बळीराजाला| शेतकरी माय बापाला, शेतकरी पुत्राला ,शेतकरी कन्येला गोमातेला| शेतीमध्ये राबणाऱ्या बैलाला जी जी
राबणाऱ्या बैलाला जी जी....||२||
नमन माझे बी बियाण्याला, रासायनिक खताला,कीटकनाशकाला, तननाशकाला |वापरल्या जाणाऱ्या शेतीमधील तंत्रज्ञानाला जी जी,
शेतीमधील तंत्रज्ञानाला जी जी....||३||
नमन माझे शेती विचारवंताला, हरितक्रांतीला,स्वामीनाथन आयोगाला |शेती सुधार कायद्याला, महाराष्ट्र राज्याला, कृषी प्रधान भारत देशाला जी जी,
भारत देशाला जी जी.....||४||
जून महिन्यात पाहून पावसाच्या सरीला, आनंद झाला शेतकऱ्याच्या मनाला |
बी बियाणे, खते आणून घराला,
बाळाचा झोका बांधून झाडाला |
शेतकरीन ओटी बांधते पोटाला,
अनवाणी चालून शेताला |
काटा टोचला जरी पायाला,
शेतकरी पेरतो शेताला जी जी.
पेरतो शेताला जी जी .....||५||
निंदनी पिकाची करून, शेतीमालाला घेतो कोळपून |,तन नाशक कीटकनाशकाच्या करतो फवारणीला, कर्ज काढून करतो शेतीला | आशा त्याला भरपूर पिक येण्याची, रास धान्याची मोजण्याची जी जी.
रास धान्याची मोजण्याची जी जी ....||६|| पिकं आली सोंगनीला, मजूर मिळेना काढणीला | आकाशी पाहून दाटलेल्या नभाला, पिकं हातचे जाण्याच्या भीतीने |तीळतीळ तुटणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजाला जी जी,
शेतकऱ्यांच्या काळजाला जी जी...||७||
पोटापुरते ठेवून धान्याला, बाजारी नेतो विकण्याला |कमी असल्या तरी किमतीला, विकावे लागते शेतीमालाला | जरी तोट्यात जात असली तरी, जागतो पूर्वजाच्या वचनाला | सोडत नाही शेती कसण्याला जी जी,
नाही सोडत शेती कसण्याला जी जी....||८||
शेतकरी पुत्र बोलला, जन्म शेतकऱ्यांच्या पोटी घेतला | गुन्हा असा काय मी केला, किती शोले जरी कष्ट शेतात |गरीबी नित्य असते घरात, दारिद्र्य वास करते अंगणात | पाहून गरिबी दारिद्र्य, कष्ट करून निघालेल्या घामाला | मिळत नाही मुलगी लग्न करण्याला जी जी,
लग्न करण्याला जी जी........||९||
खाते, बियाणे ,मजुरी ,डिझेल यांच्या किमती गगनाला भिडलेल्या, शेती करण्याचा खर्च वाढलेला | कोरडा दुष्काळ आला सोबतीला, पिके करपून गेलेली | कसे फेडावे म्हणतो कर्जाला, निघतो आत्महत्या करण्याला | या संकटातून शेतकऱ्याला, बाहेर काढण्याला धावून यावे बळीराजाच्या मदतीला जी जी,
बळीराजाच्या मदतीला जी जी.....||१०||
महाराष्ट्र राज्यात कोरडा दुष्काळ पडलेला, जागोजागी पाणी अडवून, पाण्याचा पुनर्वापर करून | मागेल त्याला विहीर देऊन, नद्या धरणांचे खोलीकरण करून | पाण्याचा करून पुनर्वापर, दुष्काळ निवारण करण्याला, एकमेकांच्या साथीने, सरकारच्या सहकार्याने , धावून जाऊ अन्नदात्याच्या मदतीला जी जी, अन्नदात्याच्या मदतीला जी जी....||११||

डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील
संत ज्ञानेश्वर महाविद्यालय
सोयगाव छ. संभाजीनगर

  • Log in or register to post comments
  • 20 views

प्रतिसाद (1)

डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर, …

डॉ. मीरा पंडित

शनीवार, November 28, 2026 - 17:09
Permalink
New

डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर, 'बळीराजाचा पोवाडा' वाचताना डफाची थाप आणि तुणतुण्याचा झंकार कानांत घुमू लागतो. महाराष्ट्राच्या या अस्सल लोककलेच्या माध्यमातून तुम्ही देशाच्या अन्नदात्याचे दुःख, कष्ट आणि त्याचा त्याग ज्या ताकदीने मांडला आहे, त्याला खरंच सलाम!
या पोवाड्याची सुरुवातच अत्यंत भव्य आणि कृतज्ञतेच्या भावनेने झाली आहे. जगदंबेपासून ते धरणीमाता, बैलजोडी, बी-बियाणे, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि हरितक्रांतीच्या शिल्पकारांना केलेले नमन रचनेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. पावसाच्या सरींसोबत सुरू होणारी शेतकरी जोडप्याची लगबग, झाडाला बांधलेला बाळाचा झोका, अनवाणी पायांना टोचणारे काटे सोसून केली जाणारी पेरणी हे सर्व प्रसंग वाचताना प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे राहतात.
कष्ट करूनही हाती न लागणारा योग्य भाव, अवकाळी पावसाची भीती, शेतकरी पुत्राच्या लग्नाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आणि दुष्काळाच्या संकटात खचून जाणाऱ्या बळीराजाची व्यथा तुम्ही अत्यंत संवेदनशीलतेने टिपली आहे. मात्र, केवळ व्यथा मांडून न थांबता शेवटच्या कडव्यात जलसंधारण, पाणी अडवणे आणि सामूहिक मदतीचा दिलेला सकारात्मक संदेश या पोवाड्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व देतो.
अस्सल ग्रामीण बाज, प्रवाही शब्दकळा आणि सामाजिक बांधिलकी जपणारी ही एक अत्यंत दर्जेदार साहित्यकृती आहे. बळीराजाचा हा गौरवगाथा रचल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

  • Log in or register to post comments

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,344 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,221 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,262 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,047 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,499 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,397 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,222 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,875 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,113 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,018 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,419 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,287 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,266 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,642 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,976 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,286 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,378 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,629 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,439 0 रानमेवा

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 188 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    31 minutes 16 seconds ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    34 minutes 10 seconds ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    36 minutes 3 seconds ago
  • डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर, …
    37 minutes 15 seconds ago
  • डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर,…
    38 minutes 16 seconds ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
आजचे शेतमालाचे बाजारभाव 304
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 154
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 102
माझे फेसबूक स्टेटस - 2 86
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 71
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 65
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 58
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 56
किती चाटणार भारतपुत्रा? 56
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 50
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 47
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 47
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 37
उद्देश आणि भूमिका 36
विचारपूस 33
कापला रेशमाच्या सुताने गळा 31
पोळ्याच्या झडत्या 30
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 25
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 24
रे नववर्षा 23

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,098
माझे फेसबूक स्टेटस-1 181,036
शुभारंभ 134,968
रानमेवा - भूमिका 109,399
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,514
आजचे शेतमालाचे बाजारभाव 93,456
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,551
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 83,057
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,641
उद्देश आणि भूमिका 77,653
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 74,083
विचारपूस 71,887
गणपतीची आरती ॥३५॥ 67,897
सत्कार समारंभ : वर्धा 66,751
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,367
किती चाटणार भारतपुत्रा? 62,041
जात्यावरची गाणी 56,055
माझे फेसबूक स्टेटस - 2 50,095
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,089
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,444

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini