नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
* * * * * * *
दैनिक देशोन्नती : ता. २२.०४.११
“आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामिण संस्कृतीची जोपासना करायची असेल तर नवयुवकांनी परिश्रमाने आणि आत्मविश्वासाने संगणकीय तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. संगणक आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून शेतीचे प्रश्न जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे” असे प्रतिपादन स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष, माजी आमदार अॅड वामनराव चटप यांनी केले.
आर्वी (छोटी) येथे संपन्न झालेल्या कवी गंगाधर मुटे यांच्या नागरी सत्कार सोहळा समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात ते पुढे म्हणाले की, ग्रामिण लोकजीवनाच्या सर्वांगिन विकासात कवितेचे फ़ार मोठे योगदान आहे. कवी केशवसुतांनी तुतारी फ़ुंकून समाजाला नव्या ज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले होते. ’’जुने जाऊ द्या मरनालागूनी, जाळुनी पुरूनी अथवा टाका” असे सांगत एका ठीकाणी कुजत बसू नका, खांद्यास खांदा भिडवून नव्या आधुनिकतेची कास धरा, असे सांगितले होते.
स्टार माझा टीव्ही द्वारा आयोजित जागतिक स्तरावरील ब्लॉगमाझा स्पर्धेत कवी गंगाधर मुटे यांच्या “रानमोगरा” या ब्लॉगला पुरस्कार आणि मी मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाकडून “वांगे अमर रहे” या लेखाला पारितोषक मिळाल्याबद्दल स्थानिक बळीराजा युवा बचत गटाच्या वतीने त्यांचा माजी खासदार मा. सुरेशराव वाघमारे यांचे हस्ते शाल व श्रीफ़ळ देवून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाला प्रसिध्द वर्हाडी झटकाकार रमेश ठाकरे, जेष्ठ पत्रकार प्रकाश कथले, जि.प. सदस्य कुंदाताई कातोरे, रमेश धारकर, डॉ. इसनकर, मधुसुदन हरणे प्रामुख्याने उपस्थित होते.
सभेचे संचालन दत्ता राऊत यांनी तर पद्माकर शहारे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष लाखे, प्रविण पोहाणे, बालाजी लाखे, अनंता लाखे, विनोद जयपुरकर, हनुमान शेंडे, चंद्रशेखर नरड, विठ्ठल वरभे, रवि जयपुरकर, जयवंत फ़ुलकर, नेमिचंद खोडे यांनी विशेष प्रयत्न केले.
************
* * * * * * *
* * * * * * *
* * * * * * *
प्रतिक्रिया
अरे वा!
मस्तच की!
पुन्हा एकदा अभिनंदन मुटेसाहेब!
धन्यवाद देव साहेब.
धन्यवाद देव साहेब, शुभेच्छा दिल्याबद्दल आभारी आहे.
शेतकरी तितुका एक एक!
पाने