नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मुक्तछंद काव्यरचना
बैताड पाऊस
हे मुर्दाड पावसा,
मनास तुझी आसं आहे
बरस ना शिवारात, असं विनाकारण जाणं-येणं बर नाही, असा मुजोर वागून साऱ्या संकटाचा धनी झाला
असो...
ऐनवेळी दगा देण्याची परंपरा कायम राखण्यात तरबेज आहेस तू , हे जगाला दाखवून दिलं .
पावसा, जर तू मनासारखं बरसलास शिवारात तर तुझ स्वागतच आहे.
आताशा लहान मुलं सुद्धा भोलेनाथाला सांग सांग भोलानाथ म्हणून तुला विचारतांना दिसत नाहीत मुळी.
म्हणून रागावलास का?
पण तुझा लटका राग आहे तरी काय कामाचा...!
असं फुगाटल्यावाणी रुसून बसणं
शोभतय का तुला...
तुला जायच असेल तर जा खुशाल,
आता आम्हीही तुला विनवणार नाही.
तुझं डोंगर-दऱ्या वरुन नाहक वाहत जाणं
तुझं तुलाच लखलाभ...
रानावनात बेछुटपणे कोसळताना प्रणयाचे धडे देणारा तू अगदी बेफान झालास...
विस्कटलेलं सखीच अस्तित्व,
तुझ्या येण्यानं चिंब होऊन, पुन्हा एकदा मन भरून बघावं म्हणतो पण ऐकतोस कुठे...
नरेंद्र भा. गंधारे
'एकांत'
प्रतिक्रिया
खूप छान छंद कविता
व्वा! बढि़या!!! नरेंद्र भाऊ
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!