नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
असल्यामुळे न काही चोरीस सूट आता
आडून धोरणांच्या करतात लूट आता //धृ//
खाऊन तुज बळावर ज्यांची हयात गेली
ते सांगती तुला की तू चूक काय केली
कपटी अशा जनांना शोधून कूट आता //१//
आडून धोरणांच्या करतात लूट आता..
लप्पास राजनेते आहेत रे हरामी
येतात काय तुझिया बरं तूच सांग कामी
सरकारच्या थुक्यावर जगतात छूट आता //२//
आडून धोरणांच्या करतात लूट आता..
सरकार हे कुणाचे झालेच ना कधीही
करतोस पण तरीही त्यालाच तू विनवणी
हिसकून घ्यायला शिक आक्रांत तूट आता //३//
आडून धोरणांच्या करतात लूट आता..
बलदंड तू गड्या रे कर गोड भिन्नता ही
शामील संगरी हो सोडून खिन्नता ही
दावून दे ठिकाणा पाजून घूट आता //४//
आडून धोरणांच्या करतात लूट आता..
विच्छिन्न भेद सारे आता खतम करावे
जगतात या मुक़ाबिल मारून मग मरावे
घे होड़ दुश्मनांची हो एकजूट आता //५//
आडून धोरणांच्या करतात लूट आता..
वृत: आनंदकन,
(गागाल गालगागा, गागाल गालगागा)
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
वा! क्या बात है गांधीजी जबरदस्त!
क्या बात गांधीजी
अप्रतिम
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने