नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
..
अरे अरे पावसा l तू असा रे कसा ll.ध्रु ll
कुठे पडतो मुसळधार l
कुठे नुसतीच हवा गार ll
झाली पेरणी ही दुबार l
तरी शेती काळीशार ll
बळीराजाही तुला आळवी पाव रे त्याच्या नवसा ll १ll
तुला जाणती जीवन सारे l
तुझ्याविना रे जीव अधुरे ll
सारी सृष्टी तहानलेली
तुझ्या स्वागता बीजे अंकुरली.
आळविती सारे जीव तुला तू निष्ठूर इतुका कसा ll २ll
तुझेअवचित येणे कळले मला l
निसर्ग शत्रू माणूस झाला l l
वृक्षा वरती आघात केला
धरतीवरती उष्मा वाढला
हे सत्य तुझे अकाली येणे तरी विनय म्हणे तुज असा ll३ll
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने