Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे

शेतकरी साहित्य चळवळ

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे
(अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम)

कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण
शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक युगात्मा शरद जोशी
यांच्या ८८ व्या जयंतीदिनानिमित्त (३ सप्टेंबर २०२३)  
सादर करीत आहोत.....

Sharad Joshi


विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३
लेखनाचा विषय : शेतकऱ्यांचा राजा बळीराजा
 प्रवेशिका सादर करण्याचा कालावधी : ०३ सप्टेंबर ते १९ नोव्हेंबर २०२३ 
 
या स्पर्धेचे चार लेखनप्रकार असतील : गद्यलेखन स्पर्धा-२०२३, पद्यलेखन स्पर्धा-२०२३, अनुभवकथन स्पर्धा-२०२३ आणि समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०२३
  1.  गद्यलेखन स्पर्धा-२०२३ : विभाग : अ) ललितलेख   ब) कथा   क) वैचारिक लेख ड) मागोवा इ) शोधनिबंध
  2.  पद्यलेखन स्पर्धा-२०२३ : विभाग : अ) पद्यकविता   ब) छंदमुक्त कविता   क) छंदोबद्ध कविता  ड) गझल   इ) गेय रचना/गीत (पोवाडा इत्यादी)
  3. समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०२३ : विभाग : अ) पुस्तक समीक्षण ब) ललित लेखांचे समीक्षण क) कवितेचे रसग्रहण

(समीक्षणासाठी व रसग्रहणासाठी पुस्तकाची/लेखाची/कवितेची निवड स्पर्धकाने स्वत:च करायची आहे. लेख/कविता "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी साधर्म्य राखणारे असणे अनिवार्य आहे.)

प्रत्येक लेखनप्रकारातील विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल.

स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे :
  • स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वतःचे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.
  • पूर्वप्रकाशित लेखन देता येईल मात्र लेखन प्रताधिकारमुक्त असावे. प्रताधिकारासंबंधी संपूर्ण जबाबदारी लेखक/कवीची असेल. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन लेखन/कविता द्याव्यात.
  • एक स्पर्धक सर्व विभाग मिळून जास्तीतजास्त कितीही प्रवेशिका सादर करू शकेल. मात्र एका स्पर्धकाचा एकापेक्षा जास्त पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. महत्तम गूण प्राप्त करणार्‍या रचनेची पारितोषिकासाठी निवड केली जाईल.
पारितोषिकाचे स्वरूप : प्रत्येक लेखनप्रकारातील विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल. पारितोषिकाचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके या स्वरूपाचे असेल.

निकाल : निकाल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल.

पारितोषिक वितरण : नियोजित ११ व्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. तेव्हा स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत पारितोषिक स्वीकारता येईल. पोस्टाने किंवा कुरिअरने स्मृतीचिन्ह व पुस्तके पाठवली जाणार नाहीत मात्र प्रशस्तिपत्र पोस्टाने पाठवण्यासंबंधी विचार केला जाऊ शकेल.
 
प्रवेशिका सादर करण्याची पद्धत :
 
  1. स्पर्धा ०३ सप्टेंबर ते १९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीसाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी खुली राहील.
  2. लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात आपले लेखन प्रकाशित करावे लागेल. ONLINE लेखन करण्यासाठी Fingure-Right  लेखन करा  Fingure-Leff  येथे क्लिक करा.
  3. स्पर्धेत सादर झालेल्या प्रवेशिका येथे पाहता येतील.
  4. लेखन सादर करण्यासाठी लेखकाला/कवीला बळीराजा डॉट कॉम चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासदत्व विनामूल्य घेता येते. SIGN IN/LOG IN केल्याशिवाय लेखन करा ही लिंक ओपन होणार नाही. लेखनस्पर्धेत लेखन कसे करावे?  याबद्दल https://www.baliraja.com/it-15 या लेखात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
  5. स्पर्धकाची इच्छा असल्यास लेखन टोपण नावाने प्रकाशित करता येईल मात्र टोपण नाव धारक स्पर्धकाचे खरे नाव संपूर्ण परिचयासह  abmsss2015@gmail.com या मेलवर कळवणे बंधनकारक आहे.
  6. स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत संपूर्ण माहिती  abmsss2015@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. (ईमेलच्या विषयात : लेखनस्पर्धा- लेखनप्रकाराचा उल्लेख असावा.) अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, संपर्क क्र, विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील/विदेशातील पोस्टाचा निवासी पत्ता देणे बंधनकारक आहे. अन्यथा स्पर्धक बाद ठरेल, याची नोंद घ्यावी.
  7. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
  8. स्पर्धेसाठी आंतरजाल हेच कार्यक्षेत्र असेल त्यामुळे जगभरातील कोणताही मराठी भाषिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. 
  9. परिक्षक मंडळ वगळता अन्य सर्वच (शेतकरी साहित्य चळवळीचे पदाधिकारी/स्पर्धा व्यवस्थापक/स्पर्धा आयोजक/स्पर्धा संयोजक सुद्धा) या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
  10. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.
  11. गद्यलेखनासाठी कमाल शब्दमर्यादा - २००० शब्द एवढी असेल.
  12. गझलेतील एकूण शेरांच्या १/५ शेर विषयाशी निगडीत असेल तरी ती गझल पात्र समजली जाईल. गझल मुसलसल असणे अनिवार्य नाही.
नियम व शर्ती :
 
  1. स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. मात्र अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या मुद्रित अथवा आंतरजालीय विशेषांकात सदर लेखन प्रकाशित करायचे झाल्यास तसा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  2. स्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन आणि अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  3. स्पर्धकाला वयाचे बंधन असणार नाही.
  4. एखाद्या विभागात कमी प्रवेशिका आल्या तरी त्यातूनच विजेता निवडला जाईल. उदा. एखाद्या विभागात केवळ ३ प्रवेशिका प्राप्त झाल्या तरी त्यांनाच पारितोषिक घोषित केले जाईल. प्रवेशिका कमी आल्याची किंवा सादर झालेल्या प्रवेशिका दर्जेदार नव्हत्या अशी किंवा या प्रकारची तत्सम सबब सांगितली जाणार नाही.
  5. परीक्षक मंडळ १० सदस्यांचे असेल. (परीक्षक मंडळात साहित्यिक, समीक्षक, पत्रकार, शेतकरी, कामगार, राजकीय व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ता यांचा योग्य त्या प्रमाणात समावेश असेल.) सर्व परीक्षकांकडून आलेल्या गुणांच्या सरासरीनुसार अग्रक्रमाने विजेते निवडले जातील. स्पर्धेचा निकाल घोषित होईपर्यंत परिक्षकांची नावे गोपनिय ठेवण्यात येतील.
  6. सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मध्ये होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
  7. एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  8. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीकडे सध्या असलेले मनुष्यबळ लक्षात घेता अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  9. निकालाबाबत अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीने नियुक्त केलेले संयोजक मंडळ व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ बांधील नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  10. शेतीविषयाला केंद्रस्थानी ठेवून नवसाहित्याची जोमाने निर्मिती होण्यास नवचालना मिळावी, असा उद्देश या स्पर्धा आयोजनामागे असल्याने ही संपूर्ण स्पर्धा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती.
                  आपले स्नेहांकित
 
           गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष
           राजेन्द्र फंड, स्पर्धा संयोजक
           रविंद्र दळवी, स्पर्धा संयोजक
           डॉ. मनीषा रिठे, स्पर्धा संयोजक
           मुक्तविहारी, तांत्रिक सल्लागार    
*  *  *
*  *  *
महत्वाची सूचना : मोबाईलवरून लेखन सादर करायचे असल्यास शेतकरी संघटना मोबाईल ऍप (Mobile App) वापरणे सुलभ ठरू शकते. 
*  *  *
 

Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 19/11/2023 - 16:18. वाजता प्रकाशित केले.
    महत्त्वाची सूचना -१
     
    आजचा स्पर्धेचा शेवटला दिवस असल्याने आज रात्री बारा वाजता स्पर्धा संपेल आणि स्पर्धेत लेखनाची सुविधा बंद होईल. तसेच संपादन सुविधा सुद्धा बंद होईल. कुणाला काही शीर्षक वगैरे बदलायचे असेल तर वेळेच्या आत बदलून घ्यावे.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 20/11/2023 - 16:22. वाजता प्रकाशित केले.
    स्पर्धा सूचना - २
     
    विश्वस्तरीय लेखन स्पर्धा 2023 मध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. 
    आपल्या सहकार्यानेच हा उपक्रम गेली नऊ वर्षे यशस्वी झाला आहे. याही वर्षी यशस्वी होणार याची खात्री आहे.
    पण 
    यंदाचा लेखनाचा विषय शेतकऱ्याचा राजा बळीराजा असा आहे. शेती किंवा शेतकरी किंवा बळीराजा असा विषय नाही. शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जाते परंतु आपला विषय शेतकरी म्हणजे बळीराजा किंवा बळीराजा म्हणजे शेतकरी अशा तऱ्हेचा नाही. स्पर्धेचा विषय स्पष्टपणे शेतकऱ्यांचा राजा बळीराजा असा आहे. स्वाभाविकपणे पुराणात/इतिहासात वर्णन केल्याप्रमाणे कधीकाळी जो बळीराजा होऊन गेला, त्या बळीराजाशी स्पर्धेचा विषय संबंधित आहे.
     
    स्पर्धेत त्या बळीराजाशी काहीही संबंध नसणाऱ्या आणि केवळ शेती किंवा शेतकरी असा विषय हाताळणाऱ्या रचनांना विषयाशी संबंधित लेखन म्हणता येणार नाही. स्वाभाविकपणे परीक्षकांच्या नजरेत त्या असंबद्ध रचना ठरतील आणि गुण कमी मिळतील हे उघड आहे. किंवा रचना कितीही उत्कृष्ट असली किंवा दर्जेदार असली तरी रचना विषयाशी असंबद्ध असेल तर ती स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
     
    सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपल्या स्वतःची रचना एकदा नजरेखालून घालावी आणि विषयाशी संबद्ध आहे किंवा असंबद्ध आहे याचा पडताळा स्वतः घ्यावा.
     
    - संयोजक

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 20/11/2023 - 16:24. वाजता प्रकाशित केले.
    स्पर्धा सूचना - ३
     
    स्पर्धेत दाखल झालेले लेखन विषयाशी अनुरूप आहे किंवा नाही याची समीक्षकाकडून तपासणी करून त्याखाली प्रतिसादात लिहिले जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आपणही आपले लेखन तपासू शकता.
     
    जे लेखन विषयाशी निगडित नाही ते स्पर्धेतून बाद केले जाण्यापूर्वी आपण त्यात काही फेरबदल करून लिखाणाला विषयाच्या अनुरूप घडवू शकता. 
    त्याविषयी लवकरच पुढील सूचना देण्यात येतील.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 20/11/2023 - 16:25. वाजता प्रकाशित केले.
    स्पर्धा सूचना - ४
     
    १) स्पर्धेत दाखल करण्यात आलेले साहित्य मोठ्या प्रमाणावर विषयाशी निगडित नाही.
    २) विषयाशी निगडित नसले तरी संबंधित साहित्यामध्ये थोडीफार सुधारणा केली, जुजबी बदल केले तर विषयाशी सुसंगत नसलेले साहित्य विषयाशी सुसंगत होऊ शकते.
     
    त्याकरिता सर्वांनी सर्वच्या सर्व प्रवेशिका वाचून काढाव्या जेणेकरून त्यांना काही नव्या कल्पना सुचून त्यांच्या साहित्यात त्यांना बदल करता येतील.
    साहित्य वाचल्यानंतर त्यावर प्रतिसाद नोंदवावा मात्र हे साहित्य म्हणजे स्पर्धेतील प्रवेशिका असल्याने निगेटिव्ह प्रतिसाद नोंदवू नयेत. केवळ चांगले प्रतिसाद लिहावेत.
     
    जे स्पर्धक स्वतः थोडेसे परिश्रम घेतील त्यांना तज्ज्ञ व ज्येष्ठ साहित्यिकाकडून अधिक मार्गदर्शन करून त्यांच्या प्रवेशिकेमध्ये २५/११/२०२३ रोजी बदल करून देण्यात येईल.
     
    सर्व प्रवेशिका खालील लिंकवर उपलब्ध आहेत.
     
     
    सहकार्याच्या अपेक्षेत
     
    - संयोजक

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 20/11/2023 - 16:27. वाजता प्रकाशित केले.
    स्पर्धा सूचना - ५
     
    १) ज्या पुस्तकात/लेखात/कवितेत बळीराजाचा उल्लेखच नसेल ते पुस्तक/लेख/कविता परीक्षण/रसग्रहण पात्र कसे ठरेल? 
    २) बळीराजा बद्दल फार कमी/तुरळक साहित्य उपलब्ध आहे पण जे थोडेफार उपलब्ध ते निवडायला हरकत नव्हती. उदा. ज्योतिबा फुले यांचे पुस्तक आणि कविता सुद्धा उपलब्ध आहे. जर कुणी योग्य पुस्तक/कविता निवडून परीक्षण/रसग्रहण केले तर त्यांना स्पर्धेत सामावून घेण्यात येईल.
    ३) लेखनात बदल करायचा असेल किंवा लेखनच पूर्ण बदलायचे असेल तर २५/११/२०२३ ला ते करण्यात येईल.
    पण
    हि सुविधा फक्त इतरांचे लेखन वाचून त्यांना प्रतिसाद देणाऱ्यांसाठीच असेल. सर्वांसांठी असणार नाही.
    कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
    ======

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 25/11/2023 - 16:29. वाजता प्रकाशित केले.
    स्पर्धा सूचना - ६
     
    पुढील आठवड्यात लेखन स्पर्धेच्या परीक्षणाचे काम सुरु होईल. ज्या प्रवेशिकेवर समीक्षकांनी लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही. असा शेरा लिहिला आहे अशा प्रवेशिका विषयबाह्य समजून त्या परीक्षकांकडे पाठवल्या जाणार नाहीत. निकालानंतर परीक्षकांवर स्पर्धकांकडून टीकाटिपणी किंवा दोषारोपण वगैरे होऊ नये म्हणून यंदा तशी काळजी घेण्यात येणार आहे.
     
    समीक्षकांनी लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही. असा शेरा लिहिला आहे पण तरीही आपली प्रवेशिका विषयानुरूपच आहे असे जर स्पर्धकाला वाटत असेल तर त्यांनी त्यांचे मत त्याच प्रवेशिकेखालील प्रतिसादात लिहावे. समीक्षकांना परत एकदा सदर प्रवेशिका पुनर्तपासणी करण्याबद्दल विनंती करण्यात येईल.
     
    कृपया नोंद घ्यावी.

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 27/11/2023 - 16:41. वाजता प्रकाशित केले.
    स्पर्धा सूचना - ७
     
    समीक्षकांच्या मते या स्पर्धेत "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयानुसार जे लेखन पात्र आहे त्या लेखनासाठी स्वतंत्र धागा निर्माण करण्यात आलेला आहे. नजरचुकीने यात जर काही प्रवेशिकांचा समावेश दिसला नाही तर कृपया लक्षात आणून द्यावे. चूक सुधारली जाईल.
     
    Ad खालील लिंकवर पात्र प्रवेशिका उपलब्ध आहेत. Ad

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 27/11/2023 - 17:09. वाजता प्रकाशित केले.
    स्पर्धा सूचना - ८
     
    अनेकांना विषय नीट न कळल्याने खालील लेखनप्रकारासाठी प्रवेशिका पात्र ठरलेल्या नाहीत. ही उणीव भरून काढण्यासाठी अंशतः स्वरूपात मुदत दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात येत आहे. स्पर्धकांनी आपल्या रचना मुदतीच्या आत abmsss2015@gmail.com या ईमेलवर पाठवाव्यात.

    १) प्रवेशिका पाठवताना लेखनप्रकार (लेखन विभाग) नमूद करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रवेशिका स्वीकारण्यात येणार नाही.
    २) विषयाशी संबद्ध नसलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाही.
    ३) पात्र प्रवेशिका १/१२/२०२३ रोजी अपलोड करण्यात येतील.
    ४) अपलोड केलेल्या प्रवेशिका https://baliraja.com/spardha-2023 या लिंकवर पाहता येतील. कृपया व्यक्तिगत संपर्क करू नये.

     
    फक्त खालील लेखनप्रकारात केलेले लेखन स्वीकारले जाईल.
     
    १) गद्यलेखन स्पर्धा-२०२३ : विभाग : अ) ललितलेख   ब)  मागोवा 
    २) पद्यलेखन स्पर्धा-२०२३ : विभाग : अ) छंदोबद्ध कविता
    ३) समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०२३ : विभाग : अ) पुस्तक समीक्षण ब) ललित लेखांचे समीक्षण क) कवितेचे रसग्रहण (ज्या पुस्तकात/लेखात/कवितेत बळीराजाचा उल्लेख असेल तेच पुस्तक/लेख/कविता परीक्षण/रसग्रहण करण्यास निवडावे.
     
    विषयाचा खुलासा - 
    शेतकऱ्याला बळीराजा असे म्हटले जाते. शेतकरी म्हणजेच बळीराजा. बळीराजा म्हणजेच शेतकरी.
    पण
    स्पर्धेचा विषय "शेतकरी राजा बळीराजा" असा  नसून थेट "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" असा आहे. त्यामुळे शेतीशी किंवा शेतकऱ्याशी संबंधित रचना असली तरी ती विषयानुरूप ठरत नाही.
    इतिहासात किंवा पौराणिक वाङ्मयात ज्या वामनकालीन बळीराजाचा उल्लेख झाला आहे, ज्या बळीराजाला वामनाने पाताळात गाडले अशी आख्यायिका आहे... त्या पुरातन काळातील राजाला "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" असे मानले जाते.
    सबब, त्या पौराणिक बळीराजाचा उल्लेख असल्याशिवाय किंवा तत्कालीन काही संदर्भ असल्याशिवाय रचना विषयानुरूप ठरणार नाही.
     
    खरं तर विषय केंद्रस्थानी ठेऊन विषयाभवती गुंफण केलेले लेखन अपेक्षित असते पण तरीही थोडी शिथिलता आणून संदर्भ किंवा उल्लेख असेल तरी लेखन ग्राह्य धरले जाणार आहे.

    शेतकरी तितुका एक एक!