नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दिवास्वप्न
स्वप्न माझ्या उरीचे या जन्मी तरी घडेन का ?
भाव बळीराजाच्या मालास..सांगा कुणी मीळेल का?
म्हणती राजकारणी आम्ही आहोत शेतकरीपुत्र
माझे त्यांचे नाते भावकीचे ..आता तरी जडेल का?
निवडणूका होतात जाहीरनामे निघतात
आश्वासनांचे बाजार खोटेखोटेच फुलतात
पंचवार्षिकमध्ये पुढच्या शेतकरी होईल मालामाल
दिवास्वप्न दाखवून पुढारी निवडणूका जिंकतात
सम्रृद्धीच्या आशेने मग बळीराजा सुखावतो
साहेबांना पुन्हा मग तो विधानसभा दाखवतो
राज्यमंत्री साहेब मग कॅबिनेटमध्ये जातात
हा मात्र पाच वर्षे जून्याच किमतीत भागवतो
आजा होता आशेत शेतमालाला भाव येईल
वडील होते अपेक्षेत हे सरकार नक्की देईल
तीसरी पीढीही माझ्या रूपात बाळगत होती मनिषा
भाव मीळून शेतमालाला दारिद्रय माझे पळून जाईल
तीन पिढ्यांच्या आकांक्षा मीळत होत्या धूळीस
सरकारला मात्र पान्हा फूटत नव्हता मुळीच
तरीही करून पुन्हा काबाडकष्ट पेरत राहीलो वावर
अन्नदाता बरे मला म्हणत असतील उगीच ?
निलेश जगदेवराव देवकर
मु.पो.डोंगरगांव,ता.जि.अकोला.444104.
(Via -P.D.K.V. Post Office Akola)
मोबाईल क्रमांक-9604919343
nileshdeokar35@gmail. com
प्रतिक्रिया
नमस्कार
नमस्कार
रचना प्रतिसादात लिहायची नसून
रचना प्रतिसादात लिहायची नसून मूळ धागा edit/संपादित करून तेथे रचना लिहायची आहे . शीर्षक सुद्धा बदलावे .
प्रतिसादात लिहिलेली रचना पात्र असणार नाही .
संपादन/Edit कसे करावे? - https://baliraja.com/it-15
शेतकरी तितुका एक एक!
सर, शिर्षक लिहील्या नंतर
सर, शिर्षक लिहील्या नंतर कविता पोस्ट करायला Boxयेत नाही आहे.
हे नीट वाचावे .
शेतकरी तितुका एक एक!
Field disabled असल्याने लेखन
Field disabled असल्याने लेखन करता येत नाही आहे सरजी
आता पुन्हा प्रयत्न करा. आता
आता पुन्हा प्रयत्न करा. आता प्रॉब्लेम येणार नाही
शेतकरी तितुका एक एक!
तीन पिढ्या याच आशेत सरल्या..
तीन पिढ्या याच आशेत सरल्या.. की, भाव मिळेल काय... छान लिहिले
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण