नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी...
उरात वणवा पेटला
डोळ्यात टिपूस दाटला
ललकरी नभास परी
वरुण तो बधीर जाहला !!
देह सुकूनी गेला रे
अन्नान दशा झाली रे
नियतीपुढं हरुनिया
फासावर हा चढतो रे !!
वाहती नुसतेच भवती
आश्वासनांचे सोसो वारे
मदतीच्या या पावसाचा
काळ्या आईस काय नफा रे !!
धरणे विहिरी आटुन गेल्या
जाताना सृष्टिस जाळून
जगण्याच्या त्रिज्या तुटल्या
अन् शेतकरी गेला जीव देवून !!
- निलेश संगिता अनंत उजाळ.
{७०४५३९८५६१}
प्रतिक्रिया
छान आशय
सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे
धन्यवाद
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!