नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मृगनक्षत्र
------------------------
आला आला आला ,
मृगाचा पाऊस आला.
तृषार्त धरतीचा,
आत्मा तृप्त झाला .........
मृद्गंध सार्या
आसमंतात दरवळला ........
सोसाट्याचा सुटला वारा,
बरसल्या गाराच गारा ..
ढगाने धरला ताल ,
तर बिजली झाली बेताल .
पाणी साचून झाले तळे,
त्यात होडी डौलात डुले ....
मृगनक्षत्र तसेही
कोरडे जात नाही ,
ते बरसतेच ,
कधी नभातून ,
आणि नभातून नाही बरसले तर..,
बळीराजाच्या डोळ्यातून ,
पण मृगनक्षत्र बरसतेच ...
सुवर्णा अशोक जाधव
१६ सप्टेंबर २०१५
प्रतिक्रिया
लेखनाचा विषय
लेखनाचा विषय "शेतकरी" असा नसून "शरद जोशी" असा आहे. त्यामुळे लेखन शरद जोशी या व्यक्तीमत्वाशी निगडीत किंवा कार्य अधोरेखीत करणारे किंवा शरद जोशींच्या विचारांचा ओझरता तरी उल्लेख करणारे असणे आवश्यक आहे.
पाने