नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दूर दूर जावे, अधिक उंचीचे डोंगर शोधावे
अन् चढून त्याच्यावर,ढगासमान गरजावे
पशू अन् पक्षी,अपूले सखेच सारे
तयांपासून उसणे,काही आत्मविश्वास घ्यावे
कल्पव्रूक्षाची भाषा, जयांनी तयार केली
तयांची फिरकी घेऊन, खुले खुले हसावे
माथ्यावरुनि आता, हात दूर करावे
करणी त्या सत्तेची,तू का विष प्यावे?
चिताही जळेल तुझी,पण ती शंभरी गाठल्यानंतर
समशेरीने चिंतेला,एका वारात कापावे
थोडे बाहेर बघूया,दिसतील हजार वाटा
वाटेवरुनि त्या, हळूहळू चालावे
राजेश जौंजाळ पोहणा जि.वर्धा
**************************
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
राजेश.... छान कविता!!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने