Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



शेतकऱ्यांचा राजा बळीराजा

लेखनविभाग: 
वैचारिक लेख

----------------------------------------

शेतकऱ्यांचा राजा बळीराजा

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ऐवजी स्वामी तिन्ही जगाचा बळीराजाविना भिकारी असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये.
ऊत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. असे आपले पुर्वज सांगून गेले.
अकबर-बिरबल यांच्या दंतकथेतही बिरबलाने शेतकऱ्यांला सर्व श्रेष्ठ म्हटले आहे.
निसर्गाच्या अवखळपणामुळे बळीराजा कालचक्रात (कां चक्रव्यूहात)अडकलाय हे खरे.
ऊतू नको,मातू नको,घेतलेला वसा टाकू नको या उक्तीप्रमाणे बळीराजाने घेतलेला वसा टिकवून धरला आहे.

पारंपरिक शेती करत असतांना १९६६मध्ये आदरणीय वसंतराव नाईक साहेबांनी 'संकरीत वाण' आणि 'रासायनिक औषधे' निर्मिती केली.सुरुवातीला त्यातून भरपूर ऊत्पन्न मीळाले हे सत्य असले तरी पुढे चालून नंतर अनेक रोगग्रस्त किडीची निर्मिती झाली व संकरीत वाण 'भ्रामक ठरले.रासायनिकामुळे विविध आजार निघाले ते वेगळे. त्यामुळे 'जुने ते सोने ' यानुसार आपले वाडवडिल ज्या पध्दतीने शेती करायचे त्याला प्राधान्याने अग्रक्रम मीळाला.
यातून गावरान बियाणे, वनस्पतीजन्य औषधी, पुर्व मशागत, शेतीलागवड यात अंशता बदल करण्यात आला.

१९९६च्या दरम्यान महाराष्ट्र शासन कृषी खात्याने एक खीडकी योजनेत बळीराजाला बहु उपयोगी योजना एकत्र करून मोलाचा सहभाग उचलला. त्यातील "विस्तार योजना" प्रभावी ठरली यात संशय नाही.

एखादा आजार निच्चीत करण्यासाठी आजारी व्यक्तीचे रक्त, लघवी,थुंकी तपासणे आवश्यक असते,जमिनीची पोत,पाण्यातील क्षार तपासणे आवश्यक बाब धरून बळीराजाची प्रगती पथावर वाटचाल सुरु आहे.
माती,पाणी तपासल्यावर जमिनीला कोणत्या खताची आवश्यकता आहे याची निच्चीती होते. एवढेच नाही तर कोणते वाण (बियाणे) पेरले तर अधिक उत्पन्न निघेल.
खताची मात्रा किती हवी हे पण समजते.पोषक द्रव्ये कोणती हे पण समजते.बाळाला अर्धा कप हवे असते,पण एक कप दुध दिल्यास अपचन होते तसे जमिनीला वाजवीपेक्षा अधिक खते दिल्याने होते. बळीराजा न कंटाळता या योजनेशी कार्यशील आहे.
गेल्या दहा वर्षापासून निसर्गाने "खेळ मांडला" या ठेक्यावर बळीराजाला नाचवत आहे.न डगमगता यावर तोडगा काढला.जमिन पुर्व मशागत,योग्य बियाणे नि निरोगी वाण शोधला.
'केल्याने होते रे!आधी केलेच पाहिजे' याला धरून बळीराजा हिम्मतीने शेती करतोय्.

नाही म्हणायला महाराष्ट्रातून "शेतकरी आत्महत्या" हा विषय राजकारणामुळे अधिक गाजतोय.याचे मुळ कारण वेगळेच असते असे माझे मत.मुल होत नाही म्हणून कोणी आत्महत्या करतो का?असा काहिसा प्रकार आहे.
खरे तर शेतकऱ्याला हमीभाव, बाजारपेठ, माल संग्रहासाठी वखार किंवा गोदाम व व्यापाऱ्यांनी केलेली अडवणूक वगैरे बाबी बळीराजाला आत्महत्येला पुरक आहेत.

विज तारा,बिनतारी यंत्रणा, मोबाईल यंत्रणा, अती मोठ्या कारखान्याचे मलनिस्सारणामुळे वाहत्या पाण्याचे दुषीत पाणी ,दुरदर्शन योजना, ध्वनीप्रदूषण वगैरे मुळे पशुपक्षांचे जिवनमान असह्य झाले आहे.यात मीत्र पशुपक्षी नष्ट होत आहेत.
मावा,गोगलगाय, तुडतुडे सारखी पिकाची हानीकारक शत्रु किड कावळा,चिमणी, पोपट सारखे मीत्रकीड नष्ट होत चालल्याने जणू शेतकऱ्यांना लुटत आहेत.

जुन्या काळात शत्रुकिडीसाठी बुजगावणे, माचेवरची गोफण,पत्र्याच्या डब्याचा आवाज किंवा तोंडानी हुर्यो अशा प्रकारचा वापर व्हायचा.आतामात्र रासायनिक फवारणी करुन विवीध आजार ओढवून घेत आहोत.

कडधान्य, नगदी पिके,भुसार माल,फळबाग, फुलबाग, बागायती पिके,वेलवर्गीय पिके,बांधावर झाडे लागवड आणि योग्य आंतर पिके घेणे गरजेचे ठरले आहे.

१९८३-८४मध्ये धुळे जिल्ह्यातील देवभाने येथे खडकावर स्वाध्याय परिवाराने आंबा,चिक्कुची फळबाग फुलवली.

औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात १९९६-९७ दरम्यान शेतकऱ्याचा दुधी भोपळा परदेशात निर्यात केला.त्याच तालुक्यातील आदर्श गांव बहिरगांवचा भाजीपाला दररोज गुजरात राज्यात ट्रक ने जातोय.

आजचा शेतकरी संघटनेत राहत नाही हे दुर्दैव. विस वर्षापुर्वी एका माणसाजवळ दहापेक्षा अधिक एकर जमिन होती. आज एकरी एक माणूस असे प्रमाण झाले आहे.
एकट्याला कमी क्षेत्रातील माल वहातुक करणे परवडत नाही, म्हणून संघटीत होणे गरजेचे आहे.यामुळे बाजारपेठ व हमीभाव पुरक ठरतात.

लसूण,कांदा,टमाटे, कोथिंबीर या मालाला एखादे वेळी अधिकचा भाव मीळाला तर सरसकट शेतकरी त्याच पिकाची लागवड करतात नि मग भाव न मीळाल्याने कचरा म्हणून ते पिक फेकावे लागते हे तितकेच खरे.

वाण,बियाणे, खते यासाठी शेतकऱ्याला गांवातील विशिष्ट व्यापाऱ्याकडून(कृषी सेवा केंद्र)ऊधारीने माल घ्यावा लागतो.शेतकरी गरजेमुळे व्यापाऱ्याला बिल मागू शकत नाही. बियाण्याच्या पिशवीवरील माहिती बघायला विसरत नाही पण टाळतो ही गोष्ट खरी.त्याचा दुष्परिणाम असा की पेरल्यानंतर ऊगवण न झाल्यास किंवा ऊगवण प्रमाण कमी झाल्यास बळीराजाला मुग गीळून गप्प बसावे लागते. कांरण ऊधारी.

साक्षरतेचे प्रमाण वाढल्याने आज तरी घरोघर साक्षर व्यक्ती आहेत.तेव्हा शेतकऱ्यांने कृषी विषयक रोजनिशी कां लिहू नये?ऊदा.शेत नांगरणी. बैलजोडी खर्च, बियाणे व खते खर्च,मनुष्यबळ खर्च,यंत्रबळ खर्च,पाणी भरणे खर्च,फवारणी खर्च याची योग्य नोंद केल्यास वर्षाखेर ऊत्पन्न व खर्च याचा मेळ घालता येईल. हमीभाव मागण्यांसाठी न्यायालयात हा तपशील पुरक ठरेल.तसेच खाजगी सावकाराकडून घेतलेले उसने कर्जसुध्दा न्यायालयात मान्य होईल.

जुन्या काळी गावात असलेल्या मंदिरात संध्याकाळी गावकरी देवाच्या दर्शनाला येत.देवाच्या ओट्यावर पांचदहा मिनीटे बसत.त्यांच्या शेतीविषयक चर्चा होत. विचारांची आदान-प्रदान होई.त्यामुळे शेतात काय अपेक्षित आहे ,हे समजत होते.
देवदर्शनाची प्रथा मोडल्यामुळे बळीराजा या प्रसार माध्यमास मुकला आहे.

नात्यागोत्यामध्ये "वानोळा"देणे ही पध्दत मोडकळीस आली आहे.वानोळा देणे म्हणजे खाणे असे नसून त्यात काय कमी-जास्त हे एकमेकांना सांगत व त्यानुसार भविष्यात बदल करत.

१९९६ साली संजय पिंपळे या शेतकऱ्यांने नाचनवेल ता.कन्नड जि.औरंगाबाद एक हेक्टर क्षेत्रांत आंबा लागवड केली.
त्यांनी मला व वरीष्ठांना पांचपांच आंबे "वानोळा" म्हणून दिली. मंडळ कृषी अधिकारी यांच्या वाट्याला एक डाग पडलेला आंबा होता. त्यांनी पिंपळे यांच्या शेतात जाऊन त्यासाठी त्या झाडावर काय करावे हा सल्ला दिला.
प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात वयोवृद्ध व्यक्तीचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

शेती आणि मी यातच बळीराजा रमतो.खरे तर त्याला जोडधंदा सक्तीचा आहे.उदा.कुक्कुटपालन, शेळीपालन, गोपालन,बैलगाडी, रेशीम ऊद्योग वगैरे.यातून शेणखत निर्मिती तर होतेच परंतु अवांतर पैसा ही मीळतो.कमी पाण्यात येणारी निलगीरी, बांबू,सुबाभूळ सारखी वृक्षवर्गीय पिके पिकवता येतात.

कृषी पदवीधर शेतकरी फळबाग, फुलबाग यावरील कलमपध्दती ,कृषी खात्याच्या विविध लाभदायक योजना निरक्षर शेतकऱ्यांना पोहचवणे ज्ञानदान ठरेल.

विस वर्षापुर्वी भारतापेक्षा लहान ईस्त्राईल देश कापुस पिकवण्यात अग्रेसर होता.जापन देशाने फिनिक्स ची भरारी मारली.आजही महाराष्ट्रातून "कृषी भुषण" शेतकरी अमेरीकासारख्या देशात अभ्यास वर्गासाठी जात आहेत.
जिल्हा स्तरावर ठिकठिकाणी नव निर्माण मालाची प्रदर्शन भरत आहेत.

२०१४ मध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राची पच्चिम किनारपट्टी "जैविक सर्वेक्षण" सुरु केले.ज्यात शेतकऱ्यांच्या फायद्याच्या विविध योजना होत्या.शेत-शेती-शेतकरी राहणीमान, उपयोगी/निरोपयोगी वनस्पती, औषधी पिके,यात गावकऱ्यांनी काय करावे याची तळमळ होती.(मी कार्यरत होतो)

अवकाळी पाऊसामुळे असलेले पाणी वाया गेले म्हणून शासनाने २०१७-२२ दरम्यान जलयुक्त शिवार योजना आणली.
"पाणी साठवण" हा मुख्य ऊद्देश लक्षात घेऊन गतीरोधकासारखे लहान लहान ऊताराला आडवे लहान छेदाचे बांध,नालाखोलीकरण ह्या दोन बाबी महाराष्ट्रभर केल्या.यामुळे हजारो टिसीएम पाणी साठा झाला. बळीराजाला हंगामी बागायती करता आली.नजीकच्या विहीरीची पाणीसाठा पातळी वाढली.

प्रशिध्द कवि विठ्ठल वाघ यांची "काळ्या मातीत मातीत, तिफण चालते" हे गीत ऐकतांना शेतकऱ्याचे चित्र ऊभे राहून,मन भाराऊन जाते. धोतराचा सोगा खोचलेला,बिनाबंडीचा घामाळलेला शेतकरी, लुगड्याच्या खोळीतून बियाण्याची 'मुठ'तिफणीत टाकणारी त्याची भार्या, पडलेले बियाणे खाण्यासाठी टपलेले पक्षी,मालकापेक्षा अधिक वेगाने चालणारी बैलजोडी, बांधावरची रीकामे बैलगाडी, त्याला बाळाची झोळी सारं सारं डोळ्यासमोर ऊभे राहते.
एवढच नाही तर कोळपणी, खुरपणी, निंदणी, कामावरचे मजूर, सारी हिरवळ चित्रपटासारखी फिरते.
यंत्रबळानी नांगरणी आणि सोंगणी एवढाच बैलांना आराम.

भरल्या पिकात कृषी खात्याचा कर्मचारी, अधिकारी येतो.बळीराजाला असलेल्या रोगाबाबत माहिती देतो.पुर्ण पिकात फिरुन प्रात्यक्षिक दाखवतो.सोबत आणलेले 'लिंग प्रलोभन सापळे" मावा रोकण्यासाठी चिकट पट्टी तर पुरवतोच,पण 'ल.मी.त.'(लसूण, मीरची,तंबाखू यांचे मीश्रीत पाणी)चे प्रात्यक्षिक ही दाखवतात. सोबत आणलेले मीत्र पक्षी बसण्यासाठी चे अँटिने पुरवतात. मीत्रपक्षी अँटीनावर बसून मावा,तुडतुडे शत्रुकिड खातात यासाठी अँटिना.हे पटवून सांगतात.
खरे तर आपले पुर्वज कपाशीत आंतरपीक म्हणून दोनदोन पामरी तुर हे पिक घेत त्यात लाल ज्वारीचे ऊंच भड(झाड) पेरायचे.आजचा कृषी खात्याचा अंटिना म्हणजे तो भड होता.

बैल पोळा.बैलाचा सण ?का माझ्या बळीराजाचा सण?
ना आराम.ना करमणूक. ना सुख.ना सणवार. ना जेवायला वेळ.ना सुखाची झोप.

सदैव कष्टाच ओझ.काय पिकलं.किती पिकलं. देणं फिटल का?पोरीचं लग्न होईल का?

नव्या दमान बळीराजा... शेतकऱ्याचा राजा नव्या जोमानं ऊठतो...बाजेवर पडलेल्या थकलेल्या मायबासाठी....ऊपवर पोरीसाठी....आणि बरोबरीने राबणाऱ्या सावित्रीसाठी...पुढील हंगामाची वाट पाहत...... भाद्रपद अमावश्येची शिमग्याची बोंब कढत तेल कानात पडावं तसं......"होळी रे होळी!पुरणाची पोळी....."

माधव खलाणेकर.
सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक
रुंगठा रेसिडेन्सि, सि/१
वैभव काँलनी, राजिवनगर
आग्रारोड. नासिक.
४२२००९
मो.क्र.८२ ७५ ५६ ३३ २१

----------------------------------------

Share

प्रतिक्रिया