![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
उन चीड चीड करते आकाशात अति।
बळीच्या आसवांनी भिजली धरती।।१।।
थंडी पावसात दिवसांत रात्री।
श्रमाला पारावार नाही, ना आरामाची खात्री।।२।।
हृदयात वेदना दुःखाच्या, मनात आशेच्या वाती।
पोसु शकेल का प्रपंच, अशी उरात भिती।।३।।
पीक येवून ही, बाजार नाडवतो किती।
माझ्या सारख्या शेतकऱ्याच्या किती हो गती।।४।।
कर्ज माफी झाली, तरी गेली नाही साडेसाती।
पैसा एक नाही हाती, ना माझ्या खाती।।५।।
धनधान्य पीकवून ही देशोधडीला माती।
चहा विकून लोकं मात्र झाले देशाचे पती।।६।।
वाटे अन्याया शिवाय काहीच नाही जगती।
आकाश पातळ सारेच शेतकऱ्याचे मरणगीत गाती।।७।।
प्रतिक्रिया
मरणगीत
शेतकऱ्यांच्या वेदनेचा! अप्रतिम
धन्यवाद
धन्यवाद धीरज साहेब
Pradip
मरणगीत
आकाश पाताळ शेतकऱ्याचे मरणगीत गाती।
अप्रतिम काव्य.. प्रदीप भाऊ!
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद
आभार सर..
Pradip
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
धन्यवाद मुटे सर!
Pradip
सुंदर कविता प्रदिप सर
सुंदर कविता प्रदिप सर
पाने