नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!
मोहमाया निमालो
पायी पंढरीला आलो
भक्तिरसाच्या प्याल्याला
उबारा पाहिजे
विठ्ठलाला पिणारा पाहिजे.. ॥धृ०॥
वेडा कुंभार तो गोरा
जणू भक्तिचा पसारा
देहभान विसरूनी
पायी तुडवित गारा
नामस्मरणाची धुंदी
त्याला चढणारा पाहिजे.. ॥१॥
जशी भक्त जनाबाई
दासी विठ्ठलाच्या पायी
आपुलासा देव केला
त्याला दळावया नेई
आत्मभान विसरूनी
त्याला भजणारा पाहिजे.. ॥२॥
’अरविंद’ गातो जरी
विठ्ठल पांडुरंग हरी
परमार्थाविना भासे
नुस्ती शब्दांची वैखरी
अंतराला करुणेच्या
सात्विक धारा पाहिजे.. ॥३॥
- गंगाधर मुटे ’अरविंद’
-----------------------
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल...
प्रतिक्रिया
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
पाने