
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जगण्या-मरण्या मधले अंतर
अस्तित्वाचे उभार खचले, मलूल असल्यावाणी
जगण्या-मरण्या मधले अंतर, उरले नसल्यावाणी
काय करावे? पुढे जगावे? अथवा बस्स करावे?
प्रश्नापोटी प्रश्न जन्मले, उत्तर फसल्यावाणी
शिकारबोड्या शब्दशराने, काळिज पाणी पाणी
घाव विषारी घट्ट चिकटला, रुतून बसल्यावाणी
प्रश्नामागून प्रश्नच प्रश्न, प्रश्नापुढेही प्रश्न
प्रश्न पिडेचा जणू चंग हा, कंबर कसल्यावाणी
फळ कर्माचे कोणा चुकले, आठवणींचा हल्ला
गोचर होती व्रण हृदयावर, अस्तर डसल्यावाणी
वेळच आली जर का बाका, गध्यास म्हण तू काका
अभय जरासे सोंग करावे, उत्कट हसल्यावाणी
- गंगाधर मुटे