Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




शहरी माणसाच्या नजरेतून शेतमालाच्या भावाचा प्रश्न

लेखनविभाग :: 
निमंत्रितांचे लेखन

शेतमालाचा भाव
=====

आयुष्यात प्रत्यक्ष शेतीशी संबंध न आलेल्या माझ्यासारख्या शहरी माणसाने शेतमालाचा भाव या विषयावर काय लिहावे? तर ही मते आलेली असतात शहरी जीवनात व व्यग्र शहरी दैनंदिनीत असलेल्या माणसांना ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचे जीवन व त्यातील आव्हाने याबद्दल काय वाटते, हे ऐकून ऐकूनच! या विषयावर स्वतःचे असे काही मत बनवावे अशी माझी योग्यता नाही याची नम्र जाणीव आहे. आम्हा शहरी माणसांना शेतकरी किंवा त्यांचे प्रतिनिधी भेटतात ते भाजी बाजारातच! तिथेही भाजीचा भाव करण्यात धन्यता मानणे आणि वीस रुपयांचे पंधरा रुपये करून घेणे यात समाधान मानण्याइतकेच आमचे ज्ञान! या वाक्यातील 'आमचे' या शब्दात माझ्यासारख्या माणसांची गणनाच मी करत आहे. जे शहरात राहूनही शेतीबद्दल, हमीभावाबद्दल, शेतीतील कष्टांबद्दल, आव्हानांबद्दल, प्रत्यक्ष उत्पन्नाबद्दल काही खास ज्ञान बाळगून असतात त्यांच्याबद्दल मी काही सरसकटपणे लिहीत नाही. त्यांचा अभ्यास, ज्ञान व माहिती आपल्याकडेही असावी अशी फक्त माझ्या मनात इच्छा असू शकते.

ही सगळी प्रस्तावना लिहिल्यानंतर, सातत्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या भयंकर दुर्दैवी बातम्या वाचल्यानंतर आणि शेतकर्‍यांच्या खर्‍या व्यथांशी एका अंशानेही ओळख झालेली नसताना मी हे मनोगत मांडत आहे व धीटपणे मांडत आहे. त्यामुळे हे मनोगत भयंकर व रास्त टीकेस पात्र होऊ शकेल याची जाणीव आहे. हे शहरी माणसाचे प्रातिनिधिक मनोगत आहे की केवळ माझे एकट्याचे हेही खरे तर मला माहीत नाही. मात्र, मी काही गोष्टी ठामपणे मांडू इच्छितो.

-- शेतमालाशिवाय कोणत्या उत्पादनाला हमीभाव मिळतो?

देशात शेकडो तांत्रिक उद्योग व्यवसाय आहेत. त्या उद्योग व्यवसायांमुळे हजारो रोजगार निर्माण झालेले आहेत. मात्र त्या उद्योगांमार्फत निर्माण झालेल्या उत्पादनांना हमीभाव मिळत नाही. हे उद्योग अगदी पूर्णतः निसर्गावर अवलंबून नसले तरी अनेक इतर घटकांवर अवलंबून असतात. या उद्योगांचे व्यवस्थापन हे जागतिक दर्जाच्या निकषांनुसार होत असते. त्यांचे विविध स्तरांवर ऑडिट होत असते. हे उद्योग सुरू करताना व चालवताना त्यातील भयकारक, नकारात्मक घटकांबाबत उद्योजकांना व कर्मचार्‍यांना पूर्ण पूर्वकल्पना असते व त्याबाबत योग्य ती काळजी घेतली जाते. हे उद्योगही अनेकदा प्रशासनाकडून मिळणारे सहकार्य, पाण्याची उपलब्धता, गंभीरपणे काम करून उद्योग पुढे नेणारे व काहीसे प्रशिक्षित असलेले कर्मचारी यांचे सहकार्य अश्या अनेक घटकांवरच तगून असतात. या उद्योगांना शेकडो परवाने आवश्यक असतात व ते परवाने ते उद्योजक मिळवतात. या उद्योगांशी निगडित कर्मचार्‍यांच्या बाबतीत काही ठराविक नियम / नियमावली लागू झालेली असते व ती पाळली जाते. हे सगळे शेतीच्या बाबतीत होते की नाही, हे सगळेच जाणतात. स्कूटर बनवली आणि एक लाखाची किंमत ठेवली आणि ती विकली गेली नाही तर कोणी मोर्चा, आंदोलन, उपोषण करत नाही. एक चमचा बनवला आणि एक डझन चमचे छत्तीस रुपयांना विकले गेले नाहीत तर कर्जमाफी मिळत नाही. शेती हा देशाचा कणा आहे याचे मूळ कारण हे आहे की या देशात प्रामुख्याने शाकाहारी लोक संख्येने बरेच आहेत. इतर देशांमध्ये मासेमारी करणे, इतर मांसाहारी पदार्थ खाणे ही नियमित जीवनशैली आहे.

आपण शेतकर्‍यांकडे कनवाळू नजरेने बघतो आहोत, की राजकीय लाभासाठी त्यांचा उपयोग करत आहोत की त्यांना डोक्यावर बसवत आहोत याचा प्रचंड पारदर्शकतेने व वस्तूनिष्ठपणे विचार व्हायला हवा आहे. हा विचार कधी होणार व कोण करणार?

शेतकर्‍यांच्या पुढच्या पिढ्या शहराकडे धावत आहेत. नवर्‍याच्या अंगाला कायम शेणामुताचा वास येतो असे कारण सांगून नव्या नवर्‍या नांदणे सोडून देत आहेत. शेतकर्‍यांच्या मुलांची लग्ने होत नाहीत आणि मुलींना किमान पुण्या-मुंबईत वन बी एच के फ्लॅट असलेला नवरा हवा आहे.

शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने बघण्याचा विचार पुढे येऊ दिला जात नाही. इस्त्राईलच्या धरतीवर शेती करता येईल का यावर नुसत्याच चर्चा झडत आहेत.

शासन आणि प्रशासन राजकीय लाभाकडे बघण्यापलीकडे जाताना दिसत नाहीत. नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात येत नाही.

शेतकरी बैलासाठी कर्ज द्या म्हणून कर्ज घेऊन त्या पैश्यातून दोन मुलींची लग्ने उरकून घेतात. बॅन्केचे लोक ऑडिटसाठी आले तर बैल कोणताही दाखवता येतो हे वेल्हे तालुक्यात नुकतेच घडले आहे.

आपल्याकडे जमीन किती, आपला संसार केवढा असायला हवा याचा विचार नाही.

हे फार धाडसी विधान वाटू शकेल, पण आजचा शेतकरी त्याला मिळत असलेल्या असंख्या लाभांच्या योग्यतेचे कार्य करत नाही.

-- भूषण कटककर

प्रतिक्रिया