नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
क्रांती
साहेब शहरातच असते दिवाळी
गावात असत फक्त दिवाळं...!
पोराच्या टिकलीच्या डबिसाठी...
कपाळी नसतो एक रूपया लावायला
कापसाच घासोड वाहून
मोडणार कंबरड...!
सुटीत असलेल्या पोराला..
कपड्यासाठी लावलं मजुरीला
साहेब तुमचा असेल हो फराळ..
बाप म्हणून मी चुरमुरे ही घेऊ शकलो नाही
साहेब तुम्हीच सांगा कसा घेणार...
दहा वर्षापूर्वी चुरमुरे होते दहा रुपये किलो
आता झाले पन्नास...!
माझ्या कपाशीला जो भाव होता दहा वर्षांपूर्वी
आताही तोच राहणार...!
साहेब कीटनाशक वाढतात
वाढतात बियाण्यांचे भाव...
ढेरी वाला पुढारी म्हणतो भाषणात शेती झिरो बजेट
त्याला म्हणावं आपल एखाद पोरग तरी शेतीत लावं...
गाजर काय दाखवतो मेल्या
मुळा शेतीत उगवून दाव...!
साहेब कर्जात जल्मलो अहो कर्जातच मरणार..
दिवाळी असो की दसरा, रावणा सारखा जळणार
साहेब माझा रक्त घामाचा आहे माल
त्याचा भाव मलाच द्या ठरवू...
तुमचा हस्तक्षेप किती दिवस चालणार
कर्जाच्या विळख्यात शेती...
शेतीवर तुमचे अघोरी कायदे
साहेब तुमच्या सह एक दिवस आग लावणार
मी नाही तर माझा पोरगा..
साहेब एकणाएकदिवस क्रांती घडवणार
- महेश
8806646250.
13.10.19. 11:03pm
प्रतिक्रिया
अतिशय सुरेख कविता. अप्रतिम महेश!
अभिनंदन
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने