नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

आता फक्त मरायचे आहे

महेश's picture
लेखनविभाग: 
छंदमुक्त कविता

आता फक्त मरायचे आहे

माझा बा आज जेवला नाही
कारण भाजीपाला विकला गेला नाही
रोजच कवडीमोल विकला जातो..
आज तो ही नाही, कळले...
कोरोनाने मार्केट बंद आहे

मग विचार केला...
साला एकतर खर्च ही निघत नाही
त्यात रोजच चालून आलेला एक एक बंद
कधी कष्टकऱ्यांचा कधी पुढाऱ्यांचा..
तर कधी निबार पोसलेल्या व्यापाऱ्यांचा बंद

आता तर म्हणे महिनें महिने
मार्केट बंद राहणार आहे
कांदा सडवायचा, भाजीपाला फेकायचा
दूध आटवायचे सारेच कर्ज करायचे आहे
मन की बात ऐकून ऐकून, आता फक्त मरायचे आहे
- महेश
8806646250.
mdesale29999@gmail.com

Share

Comments

Layout Settings