नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गझल : शेती चरून गेली
शेती पहा किती ही धाकी भरून गेली.
विळख्यात ती ऋणाच्या बघ गुदमरून गेली.
न्यायालयातही हो मी न्याय मागला पण,
बकरीच कायद्याची शेती चरून गेली.
मज वाटले असे की मिळणार दाम माझे,
फुकटात पण व्यवस्था मज वापरून गेली!
म्हणताच फक्त द्यावा मज भाव या पिकाला,
कुत्र्यापरी व्यवस्था ही कावरून गेली.
दुष्काळ सोसतांना मग याचना फुलांची,
वाटेत शेत्कऱ्यांच्या काटे करून गेली.
"सर्वास पोषणारा बेजार शोषणाने"
पाहून या व्यथेला नयने भरून गेली.
मेलो तरी 'धिरज' मी रडले कुणीच नाही,
सर फक्त पावसाची सरणावरून गेली.
धिरजकुमार ताकसांडे
हिंगणघाट
प्रतिक्रिया
सर एक पावसाची सरणावरून गेली.
सर एक पावसाची सरणावरून गेली. खूपच छान line सर.
Khoop mast
Bakrich kaydyachi Sheti charun geli
धन्यवाद! गांधीजी!!
आभार आपले!!!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद! सर.
आभार आपले!
बकरीच कायद्याची शेती चरुन
बकरीच कायद्याची शेती चरुन गेली. Very good.
Narendra Gandhare
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण