नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
माई काई माती रूसली.......
खताचा तुटवडा अनं त्यात पानी झालं कमी,
उपाशी पालणहार अनं सरकार देते हमी,
आधुनिकतेची अवदसा कानामागून सुचली,
युरीयाचा हैदोसच झाला माई काई माती रूसली,
शेणापाचोळ्यांचं खतं आता मिळंत नाही तिले,
भेगा पडल्या मोठ्या आपण डोळेझाक केलेे,
पारंपारीकतेची पध्दत मनातूनच पुसली,
युरीयाचा हैदोसच झाला माई काई माती रूसली,
निंदन करून तन काढूनं रोप व्हायची मोकळी,
तननाशकाने आता माई माती झाली पोकळी,
पैशामागं लागून बैलाची मशिनीला बांधली मुसली,
युरीयाचा हैदोस झाला माई काई माती रूसली,
आधुनिक हत्यारांनी मातीची कमी झाली तहान,
फवारे मारून तर्हेतर्हेचे आम्ही ठरतो महान,
कुपोषित तिला करून आधुनिकताही हसली,
युरीयाचा हैदोस झाला माई काई माती रूसली.
लेखन.. एजाज बी शेख
9665203106
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने