अश्रूंच्या बांधावरती
राजा बळीराजा अशी दे
हाक मला बळीराजा दे........धृ
कुठं शोधू मी तुला रे
सारी अंधारली वाट
दूर जाऊनी प्रकाशा
का फिरविली पाठ
सरकारी धोरणांनी
माझा खजिना लुटला
आज जाण त्याची होऊ दे...........१
होता शेतीचा तो राजा
होता माझा बळीराजा
धान्याच्या राशी दारी
सुखी होती तेव्हा प्रजा
येता दिवाळीचा सण
आठवण त्या राजाची
साऱ्या जगताला होऊ दे...........२
नको घाबरू तू आता
लढा हक्काचा लढूया
अश्रूंच्या बांधावरती
राज्य बळीचे आणूया
मार्ग काढुनी नव्याने
दिस येईल सुखाचे
साथ मला तुझी अशी दे...........३
- रंगनाथ तालवटकर
चिखली (कोरा)
त.समुद्रपूर जि. वर्धा
7387439312

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
गंगाधर मुटे
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


लेखन छान आहे.
समीक्षक
लेखन छान आहे.
धन्यवाद सर
RANGNATH TALWATKAR
धन्यवाद सर