नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सरींचा कहर
पावसाची सर
प्रेमाला बहर
पण गळतेया घर
गरीबाचे
सरींचा कहर
प्रेमाला बहर
पण फुटतोया नहर
धरणाचा
सरींचा कहर
प्रेमाला बहर
पण बुजलाय दर
उंदराचा
सरींचा कहर
प्रेमाला बहर
पण डुबलेय शहर
पुराखाली
सरींचा कहर
प्रेमाला बहर
बगळा जमिनीवर
उताना
सरींचा कहर
प्रेमाला बहर
पण जीवाला घोर
या सरींचा
सरींचा कहर
प्रेमाला बहर
पाय घसरून कमर
लचकली.
सरींचा कहर
प्रेमाला बहर
वाहून गेलाय खर
कुंभाराचा
सरींचा कहर
प्रेमाला बहर
पण थंडीने वानर
कुडकुडले.
सरींचा कहर
कोसळले छप्पर
मदत येईस्तोवर
जीव गेला
गंगाधर मुटे
………………………………………
उंदराचा दर म्हणजे उंदराचे बीळ
प्रतिक्रिया
वा मुटे साहेब ' लोक श्रावन
वा मुटे साहेब ' लोक श्रावन मासी हार्षमानसी ' सारखे पावसाचे गोड वर्णन करतात , पण तुम्ही मात्र पावसा मुळे गरीबाच्या झोपडीत काय घडते याचे वास्तववादी चित्रण आपल्या कवितेतुन मांडलेले आहे , आपल्या कविता वास्तवादी आसतात म्हणुनच बुवा आपल्याला आवडतात .
good morning mute saheb
पाने