नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अभंग - दहीहंडी
दिसे दहीहंडी ! उधानते मन
येती सारे जन ! उत्साहातं
गोकुळात हरी ! चोरी दहीकाला
आपलाच बाला ! भासे कृष्ण
पडताच कानी ! डीजेचा गोंगाट
गोविंदा सुसाट ! गल्लोगल्ली
चढाओढं भारी ! थरावरं थरं
रचतिया पोरं ! आवेगातं
थरं एक एक ! जसे चढे पोरं
ओढे तसे दोरं ! खालीखाली
हातातली हंडी ! जाये वरं वरं
तसे होई पोरं ! आक्रमक
संस्कृतीच्या नावे ! घालतात घोळं
मरणाचा खेळं ! थरावरं
आमिष पैशाचे ! दाखवूनी वेळी
खेळविती खेळी ! जीवनाशी
चढता चढता ! उधळते डावं
निरागस जीवं ! कोसळती
एकल्या पोराचे ! तुटे हात पायं
करील ते कायं ! मायबाप
कित्येक गोविंदा ! झाले जायबंदी
तरी नाही बंदी ! नवथरं
सांभाळूनी करा ! उत्सव साजरे
उगा लागते रे ! गालबोटं
हव्यास उंचीचा ! आता तरी सोडा
उगीचच खोडा ! जीवघेणा
सणवार असे ! आनंदाचे साठी
मरणाचे पाठी ! सण कसा
सांगुनिया गेले ! थोर साधू संत
उत्सवाचा अंत ! गोडव्हावा
रवींद्र अंबादास दळवी नाशिक
९४२३६२२६१५