नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
।*नावहीन गाववेदना*।
जगायचा हिशोब गड्या
तुझ्यापुढे मांडतो आहे
विखुरलेल्या गवताची
काडीकाडी बांधतो आहे........1
बांधावरल्या भांडणातच
पिढ्या साऱ्या झाल्या खोरी
अज्ञानाचे वाढवीत तण
दलालांच्या पिकल्या बोरी........2
राजकारण गावकीचे
भावकीचेही उसवी टाके
हाती धरल्या फावड्याने
भावाचेच फोडतो डोके.........3
वास भिजत्या मातीचा
बेंबीदेठी भिनला पाहिजे
शेजाऱ्याच्या वावरातही
वारस तुझा रांगला पाहिजे.......4
एकोप्याचे मांड गणित
कानामनात कर पेरणी
जागतिकीकरणासाठी
बांधाबांधात कर बांधणी.........5
मातीपोटी पोसले वैर
मुळ्या उकरुन खांडतो आहे
नावहीन गाववेदनेतून
हुंकार नवा सांडतो आहे.........6
* रावसाहेब जाधव(चांदवड)*
(9422321596)
प्रतिक्रिया
वाचकांनी प्रतिसाद नोंदवल्यास मार्गदर्शन मिळेल
वाचकांनी प्रतिसाद नोंदवल्यास मार्गदर्शन मिळेल
तरी मार्गदर्शनपर प्रतिसादाची अपेक्षा.
रावसाहेब जाधव (चांदवड)
आता अंतर्गत समस्यांचाही सामना
आता अंतर्गत समस्यांचाही सामना करण्याची वेळ आली आहे.
प्रबोधनाची गरज आहे.
रावसाहेब जाधव (चांदवड)
लेखनाचा विषय
लेखनाचा विषय : मा. शरद जोशी
(लेखन शरद जोशी या व्यक्तीमत्वाशी निगडीत व अधोरेखीत करणारे असावे)
पाने