Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची

प्रश्न:- नमस्कार साहेब, मला हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची लावायची आहे आणि त्यासाठी मी नामधारी कंपनीचे एन एस २८०,२८१ हे वाण निवडले आहे. तेव्हा बियाणे किफायती कुठे मिळेल व आज बाजारात बियाणाची काय किमत आहे .तसेच लागवडी विषयी संपूर्ण माहिती द्यावी ही नम्र विनंती. संदिप संधान - ९४२२९६४२७४.

उत्तर:- सर, नमस्‍कार
ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी ऑगस्ट किंवा नोव्हेंबर महिन्यात बियांची पेरणी करतात.

खते आणि पाणी व्यवस्थापन -

ढोबळी मिरचीला हेक्टरी २० टन शेणखत, १५०किलो नत्र, ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश द्यावे. नत्र तीन भागांत विभागून लागवडीच्या वेळी, ३० दिवसांनी व ५०-६० दिवसांनी द्यावे.
मिरचीच्या बागायती पिकाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी पाणी देऊ नये. झाडे फुलावर आणि फळावर असताना पाण्याचा ताण पडू देऊ नये.
रोप लावणीनंतर १० दिवसात शेतात रोपांचा जम बसतो. या काळात एक दिवसाआड शेताला हलके पाणी द्यावे. त्यानंतर ५ दिवसांच्या किंवा एक आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावे. साधारणतः हिवाळ्यात १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी. तर उन्हाळ्यात ६ ते ९ दिवसांनी पाणी द्यावे. ठिबक सिंच पध्दतीनेही पाणी देता येते. त्यामुळे पाण्याची बचत होऊन उत्पादन वाढते.

किडी-

फुलकिडे (थ्रिप्स) - फुलकिडे हे किटक आकाराने अतिशय लहान असून त्यांची लांबी एक मिलीमिटरपेक्षाही कमी असते. त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. हे किटक पाने खरवडून त्यातून बाहेर येणार्‍या रसाचे शोषण करतात. त्यामुळे पानांच्या कडा वरच्या बाजूला चुरडलेल्या दिसतात. हे किटक खोडातील रसही शोषतात, त्यामुळे खोड कमजोर बनते, पाने गळतात आणि झाड सुकते. याशिवाय फुलकिड्यामुळे बोकडया (चुरडामुरडा) या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. या किडीच्या उपद्रवामुळे मिरचीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

उपाय - या किडीच्या बंदोबस्तासाठी रोप लावणीपासून ३ आठवड्यांनी पिकावर १५ दिवसांच्या अंतराने ८ मि.मी. डायमेथोएट १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. किंवा रोप लागवडीनंतर १० दिवसांनी मोनोक्रोटोफॉस १५ मि.ली. १० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.

कोळी (माईटस) - या कीडीला पायाच्या चार जोड्या असल्यामुळे या किडीच्या समावेश किटकवर्गात होत नाही. ही किड अतिशय लहान असून किडीचा रंग पिवळसर करडा असतो. कोळी पानातील रसाचे शोषण करतात. त्यामुळे पानांवर चुरडा दिसू लागतो. चुरडलेल्या पानाच्या कडा खालच्या बाजूस मुडपल्या जातात. फुलांच्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास फुले गळतात. फळे वेडीवाकडी होतात आणि फळांच्या आकार लहान राहतो.

उपाय - कोळी या किडीच्या नियंत्रणासाठी २० ग्रँम पाण्यात मिसळणारे गंधक १० लिटर पाण्यात मिसळून त्याची झाडांवर फवारणी करावी.

मावा - मावा हे किटक मिरचीच्या कोवळ्या पानांतील आणि शेंड्यातील रस शोषण करतात. त्यामुळे नविन पाने येणे बंद होते.
उपाय - मिरचीच्या लागवडीनंतर १० दिवसांनी १५ मि.ली. मोनोक्रोटोफॉस १० लिटर पाण्यात मिसळून त्याची रोपांवर फवारणी करावी.

याशिवाय मिरचीवर आढळणार्‍या लीफ मायनरचेही नियंत्रण या किटकनाशकामुळे होते.

महत्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण -

१) रोपांची मर - (डँम्पींग ऑफ) हो रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. गादीवाफ्यात किंवा लागवडीनंतर रोपांना बुरशीची लागण होते. लागण झालेली रोपे निस्तेज आणि मलूल होतात. रोपाचा जमिनीलगतचा खोडाचा भाग आणि त्यामुळे रोप कोलमडते.रोप उपटल्यावर सहज वर येते.

उपाय - या रोगाच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात ३० ग्रँम कॉपर ऑक्सीक्लोराईड (५०टक्के) मिसळून हे द्रावण गादीवाफे किंवा रोपांच्या मुळाभोवती ओतावे.

२) फळे कुजणे आणि फांद्या वाळणे - (फ्रुट रॉट अँड डायबँक) हा रोग कोलीटोट्रीकम कँपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगाच्या प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वर्तुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात. बुरशीमुळे झाडाच्या फांद्या शेंड्याकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरता. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यावर काळे ठिपके दिसतात.

उपाय - या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्यांच्या नाश करावा. तसेच झायरम किंवा डायथेन एम - ४५ किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध २५ ते ३० ग्रँम १० लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर १० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा फवारावे.

भुरी - (पावडरी मिल्ड्यू) भुरी रोगामुळे मिरचीच्या पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर पांढरी भुकटी दिसते. या रोगाच्या प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडाची पाने गळतात.

उपाय - भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच ३० ग्रँम पाण्यात मिसळणारे गंधक किंवा १० मि.ली. कँराथेन १० लिटर पाण्यात मिसळून मिरचीच्या पिकावर १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

* * *

(वरील सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतकर्‍यांनी या माहितीचा वापर स्वत:च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता कृषि विज्ञान केंद्र बारामती जबाबदार राहणार नाही.)

Share

प्रतिक्रिया