![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
लाल लाल डोळ्याचा
महाभयंकर पापी सर्प
त्याच्या जीवघेण्या विळख्यातून
आपल्या मुलांना सोडविण्यासाठी
संघर्ष करणारा बाप ''लाओकुन''
मायकेल अँजलोची पेन्टीग बघून
शरद जोशींची आठवण झाली.
जगण्याची आणि जगवण्याची
शेतकऱ्यांच्या हक्काची
लढाई डोळ्यासमोरून गेली.
आजही चित्र तेच आहे,
फक्त चित्रात लाओकुन नाही.
लाओकुन कुठे गेला?
लाओकुनचा संघर्षांत अस्त झाला का?
चित्रात तो दिसायलाच हवा पण..
लाओकुन समजून
पाठवले संसदेत ज्यांना,
त्या सर्वांचाच उलट सर्प झाला अन्
भांडवलशाहीचा दर्प आला.
व्यवस्था मारायला तैयार आहे.
कर्जाच्या विळख्यात शेती उभी आहे.
यातून सुटण्यास नवा संघर्ष हवा आहे.
बाप बनून करा संघर्ष नवा,
ठेवून ''लाओकुन'' सारखा आदर्श!
प्रतिक्रिया
Khoop sunder
Badhiya Kavita guruji
तुमच्या कवितेतून लढवय्ये
तुमच्या कवितेतून लढवय्ये चरित्र शोधण्याचा खूप छान प्रयत्न झाला.अप्रतिम रचना सर.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
http://www.baliraja.com/node/118
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
अंगारमळा - अंक - ११
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप