नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
व्रुत्त-आनंदकन
गण-
गा गा ल गा ल गा गा.. (यति).. गा गा ल गा ल गा गा
वाटे मला जरी हे नि:शब्द प्राण आहे
लाकूड तोडलेले चीते समान आहे
नि:शब्द पाखरांचा घेऊन जीव सांगा
म्हणणार कोण मजला आता शहाण आहे
भेंडीवरी फवारे मारून शीर पिकले
मातीत चाललो मी पायास खंत आहे
पाहून हाल माझे गेले पळून सारे
येणार ते कशाला येथे अजून आहे
पक्षांत वाटलेले घेतात सर्व निर्णय
सत्या तुझ्या सतीची हाती कमान आहे
त्रासून तू कशाला करतोस आत्महत्या
देऊन धीर म्हणतो 'राजेश' देव आहे
राजेश जौंजाळ पोहणा
***************************
प्रतिक्रिया
व्वा मस्त!
छान गझल. आवडली.
Dr. Ravipal Bharshankar
पाने