नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
(मतला)
जनतेत हीच चर्चा सर्वत्र होत आहे.
सरकार हे अताचे घोटाळबाज आहे.
(१ ला शेर)
भूकेन पेटलेल्या देशात या उपाशी,
राफे(के)ल ओतणारे खादाड नीच आहे!
(२ रा शेर)
कृषकास दुप्पटीने देणार हाफ इंकम,
सरकार चोरट्यांचे हे पूर्ण सत्य आहे!
(अंतिम शेर)
खोटार हे कुणाचे होतात का कधीही?
इतकाच एक मुद्दा चर्चेत आज आहे!
(मक़ता)
'रविपाल' मी कशाला वादात या पडावे?
बोलून कोणता मज उद्धार होत आहे!
~गझलकार: डॉ. रविपाल भारशंकर
°°°
वृत्त: आनंदकन गणात्मक (गणभंग न करता).
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
बढिया डॉ साहेब!!
खोटार हे कुणाचे होतात का कधीही
इतकाच एक मुद्दा चर्चेत आज आहे.... मस्त!!!
धन्यवाद भाऊ!
खुप खुप आभार!
Dr. Ravipal Bharshankar
पाने