लोकशाहीची रेसिपी
- Read more about लोकशाहीची रेसिपी
- 1 comment
- Log in or register to post comments
- 5290 views
ऊठ मर्दा ऊठ
आवळून घे मूठ
हाण त्याच्या टाळक्यात
पायामधला बूट
सत्तेपुढे शहाणपण
जेव्हा व्यर्थ जाते
माणुसकीचे लचके तोडून
लाचखोर खाते
पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
श्रीगणेशा..!!
नमन करतो श्री गणेशा, वक्रतुंडा रे परेशा लेखना प्रारंभ करतो, तरल शब्दा दे परेशा शक्य करसी तू अशक्या, गम्यता देसी अगम्या लक्ष अपराधास माझ्या, तूच पोटी घे परेशा तू गजानन निर्विकल्पा, फेड माझ्या तू विकल्पा वेल कवितेची चढू दे, वृक्ष तू व्हावे परेशा तूच माझा सोयरा रे, पाठराखा तू सखा रे तूच माझा भाव भोळा, मधुरसे गाणे परेशा अभय कविता देखणी तू, वृत्त्त तू, स्वरशब्द तू रे अंत्ययमका संग दे ते यमक तू माझे परेशा
//आईचं छप्पर// कडाक्यात भांडतात मेघ गडगड करून भरून येते नभाला अश्रू ढाळते वरूण ...! अश्रू बनती गारा वादळ तांडव करी गारठल्या हवेसवे विजेस हिव भरी ...! हिव भरल्या विजेस ताप चढवी गारा तिला पांघराया छप्पर नेतो वारा ...! छप्पर उडल्या संसारात ब्रह्मपुत्रा वाहते तेल मिरची शिदकुट पाण्यावरती पोहते ....! पोहताना पुस्तक वही सरस्वती भिजते माती करून जीवाची चूल उल्हे निजते ....! गरजत्या पावसात चोळी झबले न्हाती पदराखाली लेकरं कवटाळती छाती ....! - गंगाधर मुटे 'अभय' ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पंढरीचा राया : अभंग पंढरीच्या राया । प्रभू दीननाथा ॥ टेकितो मी माथा । तुझे पायी ॥१॥ युगे किती उभा । एका विटेवरी ॥ येवुनी बाहेरी । पाहा जरा ॥२॥ बदलले जग । आणि माणसेही ॥ तशा देवताही । बदलल्या ॥३॥ कनकाच्या भिंती । सोन्याचे कळस ॥ सोन्याची हौस । देवालाही ॥४॥ त्यांचे भक्त बघा । विमानाने जाई ॥ आम्हा का रे पायी । बोलावतो ॥५॥ देव गरिबाचा । तू राहिला गरीब ॥ भक्तही गरीब । ठेविले तू ॥६॥ आम्हां का रे असा । गरिबीचा शाप ॥ असे काय पाप । आम्ही केले? ॥७॥
शुभहस्ते पुजा : अभंग प्रथम पुजेला । लालदीवा मस्त ॥ सत्ताधारी हस्त । कशाला रे ॥१॥ त्यांचे शुभ हस्त । कसे सांगा देवा ॥ हरामाचा मेवा । चाखती ते ॥२॥ लबाड लंपट । तयांची जमात ॥ माखलेले हात । रक्ताने गा ॥३॥ पाय तुझे कैसे । नाही विटाळले ॥ मन किटाळले । कैसे नाही ॥४॥ म्हणा काही देवा । आहे साटेलोटे ॥ अभयास वाटे । शंका तशी ॥५॥ गंगाधर मुटे ....................................................................
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९ ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. नियमावली
Copyright © Baliraja.Com - All rights reserved
Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini
Recent comments ताजे प्रतिसाद