देश चालवायचा म्हटले की
लोकशाही पाहिजे
लोकशाहीसाठी पक्ष पाहिजे
पक्षासाठी नेते पाहिजे
नेत्यासाठी पैसा पाहिजे
पैशासाठी भ्रष्टाचार पाहिजे
भ्रष्टाचार केला की पैसा येतो
पैसा आला की नेते मिळतात
नेते मिळाले की पक्ष चालतात
पक्ष चालले की लोकशाही चालते
लोकशाही चालली की देश चालतो
भ्रष्टाचार जीवनाश्यक आहे
कारण श्रमाला प्रतिष्ठा नाही
श्रमाला प्रतिष्ठा नाही म्हणून
ऐतखाऊंचा सुळसुळाट आहे
ऐतखाऊंचा सुळसुळाट कारण
कायदा त्यांचा रखवालदार आहे
कायदा त्यांचा रखवालदार कारण
ऐतखाऊ संसदेत जातात
ऐतखाऊ संसदेत कारण
नोटा केवळ त्यांच्याकडे असतात
त्यांच्याकडे नोट असतात
म्हणून त्यांना व्होट मिळतात
नोटाशिवाय व्होट नाही आणि
व्होटाशिवाय नोट नाही
नोटा-व्होटाच्या मायाजाळात
लोकशाही फसली आहे.
पैसा, जात, धर्म, मोहात
सतत लोकशाही फसत आहे
दीन, दलित, गरीब, श्रमिकांवर
म्हणून लोकशाही रुसत आहे
प्रतिक्रिया
नवराष्ट्र्र १ ९ -० ८ -२ ० २ ४
शेतकरी तितुका एक एक!
पाने