![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ऊठ मर्दा ऊठ
आवळून घे मूठ
हाण त्याच्या टाळक्यात
पायामधला बूट
सत्तेपुढे शहाणपण
जेव्हा व्यर्थ जाते
माणुसकीचे लचके तोडून
लाचखोर खाते
पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
अन्यायाची सीमा जेव्हा
मर्यादेला लांघते
तुझे हक्क तुडवून
तिरडीवर बांधते
शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
पोशिंद्याच्या छाताडावर
हरामींच्या मौजा
तेव्हा राज्य करतात
लुटारूंच्या फौजा
सत्ता आणि दलालांची, कर ताटातूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
माय तुझी बैलावाणी
राबराबून मेली
गल्लीमध्ये मुळं अन्
दिल्लीमध्ये वेली
अभयाने शोध घे, कोणी केली लूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
- गंगाधर मुटे "अभय"
शेतकरी साहित्य संमेलन, अलिबाग सादरीकरण
======
अ.भा.विद्रोही साहित्य संमेलनातील कवीसंमेलन - सादरीकरण
दिनांक १७ जानेवारी २०१५ ला बुलडाणा येथील १३ व्या अ.भा.विद्रोही साहित्य संमेलनातील कवीसंमेलनातही कविता सादर केली. उपस्थित रसिकांकडून या कवितेला उदंड प्रतिसाद मिळाला. आणि त्यांनी ही कविता अक्षरश: डोक्यावर घेतली. रसिकांना मनपूर्वक धन्यवाद.
कविता ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
Attachment | Size |
---|---|
![]() | 4.41 MB |
प्रतिक्रिया
वाहव्वा मुटे साहेब
मिसळपाववरील parag p divekar यांचा प्रतिसाद
वाहव्वा मुटे साहेब
एकदम ए के ४७ काढल्यासारखी वाटतीये.समरगीत /युद्धगीत काय म्हणाल ते म्हणा...पण अतिशय प्रभावी आहे.
शब्दाशब्दातून भावना प्रकट झालीये.
शेवटच्या कडव्यात तर या मागची आख्खी भावना/वेदना टाहो फोडून बाहेर आलेली आहे.
वाहव्वा अतिशय मर्मग्राही व परीणामकारक काव्य.
लय भारी!!
मिसळपाववरील नगरीनिरंजन यांचा प्रतिसाद
लय भारी!! एकेक कडवं ठासून भरलेल्या दारूच्या स्फोटात उडालेल्या तप्त तोफगोळ्यासारखं आहे.
कविता अत्यंत घणाघाती
फेसबुकवरील फेस बुके यांचा प्रतिसाद
आपली ही वीर रसातील कविता अत्यंत घणाघाती की काय म्हणतात,तशी वाटली.मनापासून अभिनंदन.
पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट !
आता हे काही मनाला पटले नाही.पौरुष हे असतेच.त्याचे 'घुट' कशाला लावावे लागतात?हे समजले नाही.मला तर आधी व्हिस्कीचे घुट आहेत की काय असे दिसले.आता माझी दृष्टी थोडी अधू आहे,त्याला माझा नाईलाज आहे.आपली कविता सध्याच्या ज्वलंत परिस्थितीत अत्यंत प्रेरणादायी ठरावी.मला ओघातच लहानपणी वाचलेली कविता आठवली.शिरवाडकरांची-
"मोरासारखा छाती काढून उभा रहा.
तिच्या नजरेत नजर घालून पहा.
सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा...
प्रेम कर भिल्लासारखं,बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवूनसुध्दा मेघापर्यंत पोचलेलं!"(कुसुमाग्रज)
आता यात ओळी थोड्या इकडे तिकडे झाल्या असतील.तर एवढे क्षम्य असणारच.आता ही कविता मला का आठवली हा एक महान दुर्बोध प्रश्नच आहे.कदाचित या प्रतिक्रियेइतकाच.तर ते अर्थातच असो. एक चांगली कविता!
आपल्या वाड:मय शेतीत कवितांचे असेच मनमुराद पिक येवो ही शुभेच्छा.धन्यवाद.
कवितेतिल 'अन' शब्दाने फार परीणाम साधलाय.
मिसळपाववरील सौंदर्य यांचा प्रतिसाद
तुमच्या कवितेतिल 'अन' शब्दाने फार परीणाम साधलाय, जस एखाद्याने घोषणा द्यावी अन अनुयायांनि त्याला साथ द्यावि तसे वाटते.
तुम्ही 'अन' पर्यंत कविता म्हणावी आणि आम्ही तुमच्या 'अन' नंतर अन्यायाच्या माथी बुटाचा तडाखा द्यावा असे काहीसे वाटले.
खूप दिवसांनी अशी विरश्रीपुर्ण कविता वाचायला मिळाली.
अजुन वीररस संपला नाही.
मिसळपाववरील अभिजीत राजवाडे यांचा प्रतिसाद
हल्ली वीररसातील कवितांचा अभाव दिसुन येतो. हि कविता वाचुन मनाला खात्री होते कि अजुन वीररस संपला नाही.
कविता प्रकाशित केल्याबद्द्ल खुप खुप आभार.
छान.
नागपुरी तडका बाकी जोरदरा झालाय.
अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
लई भारी..तुफानी,
मुटेजी,
लई भारी..तुफानी, मर्मावर घाव घालणारी कविता !
या ओळीं वाचुन या पोशींद्याची लेकरं आता नक्कीच आणखीन पेटुन उठतील यात शंका नाही.
अनिल
अॅक्शनपॅक्ड कविता
मायबोलीवरील देवनिनाद यांचा प्रतिसाद.
सणसणीत आणि तितकीच एक अॅक्शनपॅक्ड कविता ... वा !! मुटेसाहेब ..
मस्त!! अप्रतिम
एकदम मस्त झाला आहे नागपुरी तडका !!! ..
सुन्दर अति अप्रतिम
श्री मुटे साहेब,
अप्रतिम, सणसणित आणखीन तेवढीच मनाला पूर्णपणे बांधून ठेवणारी .
श्री प्रमोद देव, ह्यांनीही छान प्रस्तुतीकरण केलंय.
सादर,
कुशग्र मुन्गी
+९१-९८९-०८५-१५६१
धन्यवाद
प्रतिसादाबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.
शेतकरी तितुका एक एक!
फेसबूक लिंक
फेसबूक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/videos/3114344185256915/
https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid0npHGW8JUSDV2tzjh21cce...
पाने
आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण