नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गळफास घ्यावयाचा माझा विचार आहे
शत्रू मला हजारो..मी कास्तकार आहे
केला गुन्हा बळीच्या पोटास जन्म घेउन
अवघे भविष्य माझे बनले टुकार आहे
देतो म्हणून देते शासन तसेच अगदी
पाऊस थेंब त्याचे देतो उधार आहे
कुठलेच देत नाही सरकार दर पिकाला
शेतीस मारण्याचा हाही प्रकार आहे
सत्ता,पगार,पेन्शन,सन्मान,हार त्यांना
अन् आमच्या नशीबी आला विखार आहे
कोणास दोष द्यावा वाइट कुणा म्हणावे
अपुलीच जिंदगी जर साली भिकार आहे
जो जो कसून मेला त्यालाच हे समजले
हे शेत..शेत नाही..मटका जुगार आहे
: महेश मोरे (स्वच्छंदी)