Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.कोरोनाचा " बळी"राजा

*कोरोनाचा "बळी"राजा*
- अनिल घनवट
२२ मार्च, पर्ण भारतात जनता कर्फ्यू लागू आहे. शहरातील सुनसान रसत्यांचे दृष्ये व किरोना बाबत तीच ती माहिती पाहुन कंटाळा आला आहे. शहरां मधील लॉक डाउन दिसत होता मात्र ग्रामिण भारताचे चित्र काही दिसत नव्हते. शहरातील रहिवासी दुकाने, कार्यालये बंद करुन घरात बसतील पण शेतकर्यांचे काय?
शेतकर्याला लॉक डाउन शक्य नाही व कर्फ्यू तर नाहीच नाही. गोठ्यात जनावरे असतात त्याना चारा पाणी करावेच लागते. शेतातील पिकांना पाणी द्यावेच लागते. तोडणीला आलेला माल तोडावाच लागतो. शेतीत काहीच थांबत नाही, थांबवता येत नाही. कष्ट थांबत नाहीत, खर्चही थांबत नाहीत, काहिही असो.
कोरोनामुळे शहरी भागातील व्यव्हार ठप्प झालेत, कारखानदारी उत्पादन थांबले आहे. आर्थिक नुकसान सर्वांचेच होत आहे यात वादच नाही. पण आज बंद झालेली दुकाने उद्या उघडतील, कारखानदारीचा माल नंतर खपेल, कार्यालये चालू होतील. काही काळात सर्व सुरळीत होइल पण शेतकर्यांचे झालेले नुकसान भरुन येणार नाही.
शेतीला जोड धंदा म्हणुन, लाखो रुपये कर्ज काढुन उभा केलेला कुक्कुटपालनाचा व्यवसाय बरबाद झाला. कोंबड्या फुकट वाटल्या, जंगलात सोडल्या, खड्डे खोदुन गाडुन टाकल्या. पोल्ट्रीसाठी होणारी मागणी घटल्यामुळे मकेचे भाव कोसळले. टमाटे, कोबी, फ्लावर सारख्या भाजीपाल्याच्या पिकात जनावरे चरायला सोडवी लागली. द्राक्ष बागायतदारांना रडू लागायला माणुस नाही. अतिवृष्टीत सुरुवातिच्या बागा गेल्या. नंतर चांगला माल लागला, सोैदे झाले पण कोरोनामुळे व्यापारी माल उचलत नाहीत. कमी दराने मागतात. उन तापायला लागले की माल खराब होतो, गळुन जातो. लाखो रुपये बुडणार, कर्ज कसे फेडायचे हा यक्ष प्रश्न त्यांच्या पुढे आहे.
कोराना रोकण्यासाठी उपयुक्त म्हणुन संत्र्याला मागणी आहे पण लॉक डाउनमुळे वाहतुकीसाठी गाड्या मिळत नाहीत. अनेक दिवस झाले माल तोडुन खोकी भरुन ठेवली आहेत, किती दिवस माल टिकणार?
शेतकरी संघटनेने पाठपुरावा केल्यामुळे कांद्यावरील निर्यातबंदी उठली, निर्यातशुल्क शुन्य झाले. आता कांद्याचे पैसे होतील ही अपेक्षा कांदा उत्पादकांना होती मात्र त्या कोरोना आडवा आला. खरिपात येणारा लाल कांदा साठवुन ठेवता येत नाही, लगेच विकावा लागतो पण सर्वच व्यव्हार बंद झाल्यामुळे पुन्हा मातीमोल भावाने विकावा लागत आहे किंवा डोळ्यादेखत सडताना पहावा लागणार आहे.
खरिपाची पिके अतिवृष्टीत गेली होती, रब्बीत चांगले पिक आले. गहू, हरभरे घरात आले पण मार्केट बंद असल्यामुळे रोज खर्चासाठी धान्य विकुन पैसे मिळवणे सुद्धा दुरापस्त झाले आहे. गावातील आठवडे बाजार बंद झाल्यामुळे छोट्या शेतकर्यांनी पिकविलेला भाजिपाला सुद्धा विकला जात नाही. बराच खर्च करुन कलिंगडाचे पिक तयार केले पण आता फेकुन देण्याची वेळ आल्यामुळे रडणार्या शेतकर्याचा व्हिडीअो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. देशातील शेतकर्याच्या प्रत्येक पिकाची हिच आवस्था आहे, सर्व इथे सांगणे शक्य नाही, वाचकांनी समजुन घ्याला हवे.
अशा परिस्थितीतही विजबिल थकले म्हणुन शेतीपंपाचा विज पुरवठा खंडित करण्याची मोहिम विज वितरण कंपनी जोमाने राबवत आहे. कर्जमाफीच्या याद्या जाहिर झाल्या पण खात्यावर पैसे आले नाहीत म्हणुन नविन कर्ज नाही. मध्यम मुदत व दीर्घ मुदतीचे कर्ज शेतकर्याला भरावेच लागणार आहे. सर्वच पिकांचे पैसे होणार नसतील तर शेतकरी हे कर्ज कसे फेडणार? जर कधी शेतीमालाला चांगले भाव मिळायला लागले तर सरकार निर्यातबंदी करुन किंवा आयाती करुन शेतीमालाचे बनाव पाडणार, मग शेतकर्यांनी कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, कार्यालयात न येणार्यांना पगारी रजा देण्याच्या सुचना दिल्या, ज्यांचे छोटे व्यवसाय आहेत त्यांना आर्थिक मदत देण्याचे जाहिर केले. त्यांना मदत मिळालीच पाहिजे यात वाद नाही. पण शहरात सर्व काम बंद असताना शेतात काम करत असणार्या शेतकर्याचा विचार करायला नको का? शेतात तयार झेलेला माल फेकुन द्यावा लागत आहे त्याची काही नुकसान भरपाई द्यायला नको का? पण तोटे सर्व शेतकर्यांनी सहन करायचे व नफा मिळविण्याची संधी आली की सरकारने आडवे यायचे हा आपल्या देशातील शिरस्ता राहिला आहे.
कोरोना हे फक्त शेतकर्यांवरील संकट नसुन देशावरील संकट आहे. याला सर्वांनी खंबीरपणे तोंड देणे गरजेचे आहे पण अशा परिस्थितीत किमान विज वितरण कंपनी व बॅंकांकडुन सूरु असलेली अत्याचारी वसुली थांबावी ही किमान अपेक्षा बळीराजाची आहे.
बळीराजा हा नेहमीच अस्मानी व सुलतानी संकटाचा बळी ठरला आहे. आता कोरोना व्हायरसचा बळी ठरतो आहे. सरकारच्या धोरणामुळे त्यच्याकडे हे संकट पार करण्या इतकीही बचत शिल्लक नाही. त्याच्याकडे बचत शिल्लक राहण्यासाठी त्याला सहानुभुतीची गरज नाही, स्वातंत्र्याची गरज आहे.

२२/३/२०२०

अनिल घनवट
अध्यक्ष, शेतकरी संघटना.

Share